IVF Treatment : स्त्रीला 'IVF उपचार' घेण्याची योग्य वेळ माहित असणे गरजेचे, वाचा फर्टिलिटी एक्सपर्टचा सल्ला

इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) हा वंध्यत्वासाठी सर्वात यशस्वी उपचार मानला जातो
IVF Treatment
IVF Treatmentesakal

IVF Treatment : गेल्या काही वर्षांपासून जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढली असल्याचे दिसते. डब्ल्यूएचओच्या मते, वंध्यत्व हा एक आजार आहे ज्यामध्ये 12 महिने किंवा त्याहून अधिक काळ नियमित असुरक्षित संभोग करूनही जोडप्यास मूल होत नाही.

बिर्ला फर्टिलिटी आणि IVF च्या सल्लागार डॉ. रचिता मुंजाल सांगतात की, प्रजननक्षमतेवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांपैकी स्त्रीचे वय हा एक महत्वाचा घटक आहे, ज्याचा प्रजनन उपचारांच्या यशावर खोलवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) हा वंध्यत्वासाठी सर्वात यशस्वी उपचार मानला जातो, ज्यामध्ये यश मिळण्याचा शक्यता दर 30 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत राहतो.

वंध्यत्व म्हणजे काय?

एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ प्रयत्न करूनही एखाद्या जोडप्याला मूल झाले नाही, तर त्यांना वंध्यत्वाचा त्रास होऊ शकतो. गर्भधारणा न होणे ही हल्ली एखाद्या स्त्रीची समस्या नसून. अनेक जोडपी या समस्येला बळी पडतात.

वंध्यत्वाची कारणे-

तणाव, गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स, शुक्राणूंच्या उत्पादनातील विकार, फॅलोपियन ट्यूब ब्लॉक, ओव्हेरियन रिझर्व्ह कमी होणे, एंडोमेट्रिओसिस, पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) आणि अकाली ओव्हेरियन रिझर्व्ह निकामी होणे यासह अनेक कारणांमुळे वंध्यत्व येऊ शकते. परंतु योग्य वयातच इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) उपचार घेतल्यास जोडप्यांना मूल होण्यास मदत होऊ शकते.

इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) कोणासाठी फायदेशीर आहे?

35 वर्षांखालील स्त्रिया ज्या तीन वर्षांपर्यंत गर्भधारणेचा प्रयत्न करत आहेत त्यांना इंट्रा-यूटरिन इन्सेमिनेशन (IUI) आणि ओव्हुलेशन इंडक्शन यासारख्या साध्या उपचारांसाठी जाऊ शकतात. हे उपचार कमी आक्रमक असतात आणि त्यांचा यशाचा दर प्रति सायकल 10 ते 15 टक्के असतो.

गेल्या काही वर्षांत आयव्हीएफचा वापर वाढल्यानंतरही, असामान्य गर्भधारणा किंवा गर्भधारणेची अनैसर्गिक पद्धतीच्या भीतीमुळे अनेक जोडपी या आधुनिक प्रक्रियेचा लाभ घेऊ शकत नाहीत. असे करून जोडपी मूल होण्याचा योग्य वेळ वाया घालवतात. याशिवाय, IVF शी संबंधित शारीरिक, आर्थिक आणि भावनिक ताण कधीकधी जोडप्यासाठी एक मोठा अडथळा बनतो.

IVF Treatment
Women Health: मूत्रपिंडाचा आजार होण्याची ही आहेत कारणे; महिलांनो अशी घ्या काळजी!

वंध्यत्वाची खरी कारणे समजून घ्या-

IVF चा विचार करण्यापूर्वी, वंध्यत्वाची खरी कारणे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यासाठी पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही सामान्य आरोग्य तपासण्यासाठी आणि अंडाशयातील ओव्हेरियन रिझर्व्ह तपासण्यासाठी प्राथमिक रक्त तपासणी केली पाहिजे.

या चाचण्यांतून वय, प्रजनन क्षमता, हार्मोनचा स्तर, स्पर्मची गुणवत्ता यासारख्या घटकांचा शोध घेतला जाईल. प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला तुमच्या प्रजनन आरोग्याविषयी संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्हाला योग्य उपचार मिळण्यास मदत होईल.

IVF Treatment
Infertility Test : वंधत्वाचा शिकार होण्याआधी जोडप्यांनी आजच करा या टेस्ट!

वय आणि महिलेची प्रजनन क्षमता

वय हा एक महत्त्वाचा घटक आहे जो विशेषतः IVF उपचारांच्या यशाच्या दरावर परिणाम करतो. जसजसे महिलांचे वय वाढत जाते, तसतसे त्यांच्या ओव्हेरियन रिझर्व्हचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे अंड्यांचा दर्जा आणि प्रमाण कमी होते. 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या किंवा 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्त्रियांच्या तुलनेत IVF उपचाराने यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त असते. (Pregnancy)

IVF Treatment
Infertility : महिला अन् पुरुषांमधे इनफर्टिलिटीची आहेत ही 14 कारणं, तरुणपणीच या गोष्टींची काळजी घ्या

एक्सपर्टचा सल्ला

IVF उपचार घेण्याची योग्य वेळ कधी आहे हे ठरवणे हा वैयक्तिक निर्णय आहे ज्याचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. तुमची परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वय, वंध्यत्वाचे मूळ कारण, वैद्यकीय परिस्थिती, भावनिक तयारी आणि एकूण खर्चाचा विचार यासारखे घटक IVF साठी आदर्श वेळ ठरवण्यात मोठी भूमिका बजावतात. (Infertility Reasons)

सर्व घटकांचा विचार केल्यानंतर आणि IVF तज्ञांकडून मार्गदर्शन घेतल्यावर, तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता ज्यामुळे तुमची उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com