Working Efficiency : डोक्याला शॉट कशाला? ब्रेनलाही करा स्वीच ऑन स्वीच ऑफ, तज्ञ सांगतात, कसं?

कामाची क्षमता वाढवणं हे आताच्या तरूणांपुढचं फार मोठं आव्हान आहे. त्यासाठी तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या
Working Efficiency
Working Efficiencyesakal

How to Develop Working Efficiency : हल्लीच्या स्पर्धेच्या युगात सगळ्यांनाच सतत सतर्क राहून सोशल मीडियावर काय सुरूये, जगात काय सुरूये, कामावर काय सुरू आहे असं सगळीकडेच लक्ष ठेवताना अजून बऱ्याच गोष्टींचा ताण घेऊन हल्लीची पिढी वावरत असते.

कमी वयात हृदय विकार, बीपी, डायबेटीस असे बरेच आजार मुलांना जडतात. याविषयी तज्ज्ञ सांगतात की, हे सगळं होण्यामागे कुठे तरी आपण चुकतोय हे ओळखायला हवं. 'सकाळ' द्वारे आयोजित स्वास्थ्यम कार्यक्रमात डॉ. हंसा जी सांगतात की, आपल्या जीवनशैलीकडे आणि मानसिक स्वास्थ्याकडे आपण डोळे उघडून बघायला हवं.

Working Efficiency
Mental Health : साफसफाई विषयी कॉनशीयश आहात? असू शकतो मानसिक आजार

डॉ. हंसाजी यावर उपाय सांगतात

  • ठरवून काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जसं वेळेवर जेवण करणं. ठरवलं तर हे नक्कीच शक्य आहे.

  • शरीराला आरामाचीपण गरज आहे. त्याचंही भान ठेवत झोपेच्या वेळा सांभाळायला हव्यात.

  • रात्री उशिरापर्यंत फोनवर वेळ घालवू नका. जरा डोळ्यांना, शरीराला, मेंदूला आराम देण्याची आवश्यकता आहे.

  • जसं शरीराला आराम आवश्यक आहे तसा मेंदूलापण आराम देण्याची गरज आहे. त्यामुळे मेंदू स्वीच ऑन स्वीच ऑफ करणं शिकायला हवं.

Working Efficiency
Mental Health : तूमच्या मनातही येतो का आत्महत्येचा विचार?

कसं करावं मेंदूला स्वीच ऑफ?

दिवस भर कामात मेंदू अ‍ॅक्टिव्ह असतो, रात्रीपण फोन बघत बसाल तर झोपेतही तेच विचार चालतील. मग मेंदूला आराम कसा मिळणार. त्यामुळे काही गोष्टी या मेंदूला आराम देण्यासाठी करणं आवश्यक आहे.

Working Efficiency
Mental Health Problem : राज्यात ४४ टक्के महिलांना मानसिक समस्या

मेंदू स्वीच ऑफ करणं म्हणजे काय?

मेंदूला विचार करावा लागू नये, आराम मिळावा याला मेंदू स्वीच ऑफ करणं असं म्हणतात. यासाठी चांगलं संगीत ऐका, डांस करा, शांत झोप काढा, व्यायाम, प्राणायाम, ध्यान करा. जेणे करून तुमच्या विचारांना आणि पर्यायाने मेंदूला आराम मिळेल.

यामुळे काय होतं?

जेव्हा तुम्ही खूप विचार करतात तेव्हा आपोआप थकवा जाणवतो. वेगवेगळे आजार जडतात. पण जेव्हा आराम मिळतो तेव्हा त्यानंतर तुम्ही दुप्पट क्षमतेने काम करू शकतात. त्यामुळे तुम्ही नियमित ब्रेन ला स्वीच ऑफ, स्वीच ऑन करायला शिकलात तर तुमची कार्यक्षमता वाढते. आजार टळतात.

जेव्हा गरज आहे तेव्हाच मेंदूचा वापर करा. बाकी वेळी उगाच विचार करत बसू नका. कधी विचार करावा कधी नाही हे ठरवता येणं आणि अंगवळणी पाडणं आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com