Workplace Anger : ऑफिसमध्ये लहानमोठ्या कारणांवरुन वारंवार राग येतो? असं करा कंट्रोल | Mental Health | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Workplace Anger

Workplace Anger : ऑफिसमध्ये लहानमोठ्या कारणांवरुन वारंवार राग येतो? असं करा कंट्रोल

आपण आपल्या दिवसातील सर्वाधिक वेळ हा ऑफीसमध्ये घालवतो. त्यामुळे ऑफीसमधील लोकांसोबत आपण इतर लोकांच्या तुलनेत जास्त वेळ घालवतो. त्यामुळे साहजिकच विचारांची देवाण घेवाण होते. जास्तीत जास्त संपर्क येतो.

या दरम्यान काही लोकांचे वागणे आपल्याला पटत नाही किंवा काही लोक असे वागतात की आपल्याला राग येतो पण ऑफीस सारख्या प्रोफेशन ठिकाणी आपला राग व्यक्त करणे चुकीचे आहे. हा राग कसा कंट्रोल करायचा, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Workplace Anger mental health stress how to control anger read story )

१. अनेकदा बॉस असो की इतर कलिग यांच्या चुकीच्या वागण्याचा आपल्याला त्रास होतो. ज्यामुळे अनेकदा आपण रागावरील कंट्रोल हरवून बसतो. तुमचा राग कंट्रोल करण्यासाठी रागामागील कारण आणि एखाद्या गोष्टीला आपण किती महत्त्व देतोय, याबाबत सखोलतेने विचार करा. तुमचा राग आपोआप कमी होणार.

२. अनेकदा आपण रागाच्या भरात तोंडात येतील ते शब्द बरळतो. त्यामुळे नको ते वाद निर्माण होतात. परंतू कामाच्या ठिकाणी बोलण्यापूर्वी तुमचे शब्द काळजीपूर्वक वापरा ज्यामुळे तुम्हालाही पश्चातापही होणार नाही आणि समोरच्यालाही त्रास होणार नाही.

३. जर तुम्हाला ऑफीसमध्ये राग आला तर त्या रागाचा आणि ज्यांच्यामुळे राग आला त्यांचा विचार करू नका. स्वत:ला कामामध्ये गुंतवा. तुम्ही मित्रालाही कॉल करू शकता त्यामुळे तुमच्या मनातलं तुम्ही त्यांच्याशी शेअर करू शकणार किंवा कामामधून थोडा वेळ ब्रेक घ्या आणि मुड फ्रेश झाल्यास किंवा राग निघून गेल्यास कामास पुन्हा सुरुवात करा.

४. राग येणे हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे लगेच रिअॅक्ट होऊ नका, हे समजून घ्या. तेव्हाच रागावर कंट्रोल ठेवता येणार.

५. अनेकदा रागात माणून डिप्रेस होतो. नकारात्मक भावना मनात येतात. अशावेळी या भावना दाबू नका. इतरांवर हा राग काढण्याऐवजी तुमच्या मनातील सर्व भावना कागदावर लिहा किंवा नोटपॅड वर टाईप करा. यामुळे तुमचं मनही हलकं होणार.