World Asthma Day : धक्कादायक! दमा वाढल्यानंतरच डॉक्टरांकडे जातात 92 टक्के रुग्ण

९२ टक्के रुग्ण प्रचंड दमा वाढल्यानंतरच डॉक्टरांकडे जात असल्याचे निरीक्षण श्वसनविकार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
World Asthma Day
World Asthma Daysakal

World Asthma Day : प्रदूषण वाढल्याने हवामानातील बदलामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होत आहे. हवेतून संसर्ग होणाऱ्या ब्रांन्कायटिससह अधिक दम लागणे, खोकला, घशात खरखर आवाज येणे, छाती भरून येणे, सर्दी आदी श्वसन विकारांमध्ये वाढ होत आहे.

यातूनच पुढे अस्थमाचा विळखा बसतो. वातावरणातील बदलाने अस्थामाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, मात्र ९२ टक्के रुग्ण प्रचंड दमा वाढल्यानंतरच डॉक्टरांकडे जात असल्याचे निरीक्षण श्वसनविकार तज्ज्ञांनी नोंदविले आहे. (World Asthma Day asthma symptoms Dust mites causes asthma attack)

उपराजधानीत ज्येष्ठ श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांच्या मार्गदर्शनात ‘क्रिम्स’मध्ये ६ हजार २५७ रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. यात सौम्य अस्थमाचे केवळ ८ टक्के, मध्यम दमा असलेले ५८ टक्के आणि ३४ टक्के तीव्र दमा असलेले रुग्ण आढळून आले.

वातावरणातील बदलाने होणारा अस्थमा (दमा) सर्वाधिक घातक ठरतो. २ मे रोजी असलेल्या जागतिक अस्थमा दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. अरबट यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले,

World Asthma Day
Childhood Asthma : तुमच्या मुलांना दमा आहे हे कसं ओळखाल ? काय काळजी घ्याल ?

अस्थामा आजारांत फुफ्फुसांतील श्वसन वाहिन्यांवर सूज आल्याने त्याचा व्यास कमी होतो. त्यामुळे या श्वसन वाहिन्या आकुंचन पावतात. अशावेळी श्वास सोडताना त्रास होतो. एकूणच फुफ्फुसांच्या क्रियान्वयनात अडथळा येत असल्याने दम लागतो. याला अस्थमा म्हणतात. ‘हाऊस डस्ट माईट’ म्हणजेच घरातील धुळीमध्ये अ‍ॅलर्जी होते.

२० वर्षाखालील १२ टक्के

२० ते ४० वर्षे ३१ टक्के

४० वर्षावरील ५७ टक्के

४० शी ओलांडलेले तीव्र अस्थमाग्रस्त २५ टक्के

घरातील धुळकणाचे ४४ टक्के रुग्ण

World Asthma Day
Pollution Asthma : दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण थेट फुप्फुसांवर करत आहे आक्रमण

घरातील स्वच्छता, झाडू, पोछा करताना आढळणाऱ्या ‘हाऊस डस्ट माईट’मुळे ४४ टक्के रुग्णांना ‘अस्थमा’ ट्रिगर झाल्याचे या अभ्यासातून पुढे आले आहे. त्यामुळे अस्थमाचा त्रास असलेल्या रुग्णांनी घराची स्वच्छता करताना विशेष काळजी घेतली पाहिजे, असे डॉ. अरबट म्हणाले.

अस्थमा विकारावर उपचार आहेत. अस्थमाचे ट्रिगर टाळावे. वेळेत औषधांसह इनहेलरचा वापर करावा. वातावरण बदलताना स्वतःला अधिक जपावे. व्यायाम आणि योगासने करून मन शांत ठेवावे. यामुळे दमा नियंत्रणात ठेवता येतो.

-डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ, क्रिम्स, नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com