

Why Breast Milk Is Considered a Lifesaving Medicine for Newborns
sakal
Importance of Breastfeeding: वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग अॅक्शन (डब्लू, ए. बी. ए.) या संस्थेमार्फत जागतिक स्तनपान सप्ताह उपक्रम जगभर राबविला जातो. आधुनिक वैद्यकशास्त्रात अनेक अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असल्या तरी आईच्या दुधाची जागा कोणतीही औषधे, यंत्रणा किंवा कृत्रिम दूध घेऊ शकत नाहीत. विशेषतः अकाली जन्मलेली बाळे, अत्यल्प वजनाची बाळे आणि एनआयसीयूमध्ये उपचार घेणारी नवजात बाळे यांच्यासाठी आईचे दूध खरे जीवनरक्षक औषध आहे. याचे महत्त्व या सप्ताहात समजून घेणे आवश्यक आहे.