World Diabetes Day: तुम्हाला डायबिटीज आहे की नाही कसे कळेल? तज्ज्ञ सांगतात महत्वाच्या चाचण्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Diabetes Day

World Diabetes Day: तुम्हाला डायबिटीज आहे की नाही कसे कळेल? तज्ज्ञ सांगतात महत्वाच्या चाचण्या

Experts Suggestion: भारताला “कॅपिटल ऑफ डायबेटीस” असं समजलं जातं. दररोजच्या बोलण्यात एकदा तरी आपण या समस्येबाबत चर्चा करत असतोच. अतिरिक्त कार्बोदकेयुक्त पदार्थांचं सेवन केल्यामुळे रक्तात जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त ग्लुकोज (साखर) वाढतं, तेव्हा त्याला आपण “डायबिटीज” असं म्हणतो. आता ही प्रमाणापेक्षा जास्त वाढलेली साखर शरीरामध्ये इंसुलिनद्वारे कशी नियंत्रित केली जाते आणि तुम्हाला डायबिटीजचा त्रास आहे की नाही ते कसे ओळखायचे ते पाहूया.

इंसुलिन हे स्वादूपिंडाच्या बीटा सेल्स ऑफ लँगरहॅन्स ह्या पेशींमधून स्त्रवीत झालेलं एक संप्रेरक (Hormone) आहे. आपण जेव्हा कर्बोदके खातो तेव्हा लगेच शरीरात इंसुलिन सक्रिय होतं आणि ते इंसुलिन ही साखर शरीरातल्या पेशींना पाठवतं व शरीराला ऊर्जा मिळते. (Diabetes)

तुम्हाला डायबिटीज आहे की नाही हे ओळखण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही महत्वाच्या चाचण्या

1. फास्टिंग शुगर (उपाशीपोटी तपासली जाणारी साखर) - 126 पेक्षा जास्त असेल तर डायबिटीज समजायचंच.

2. PP शुगर (जेवणानंतर दोन तासाने तपासली जाणारी साखर) – 140 पेक्षा जास्त असेल तर डायबिटीज समजायचाच.

3. HbA1c (मागील 3 महिन्यातील साखर तपासली जाते) - 5.7 पासून पुढे असेल तर डायबिटीज समजायचाच. (Pre-diabetic स्टेज दुर्लक्ष करू नये. तो डायबिटीज आहे असचं समजा).

हेही वाचा: World Diabetes Day: या आठ कारणांनी वाढतं तुमचं ब्लड शुगर लेवल; वेळीच सावध व्हा नाहीतर...

इंसुलिन हे स्वादूपिंडाच्या बीटा सेल्स ऑफ लँगरहॅन्स ह्या पेशींमधून स्त्रवीत झालेलं एक संप्रेरक (Hormone) आहे. आपण जेव्हा कर्बोदके खातो तेव्हा लगेच शरीरात इंसुलिन सक्रिय होतं आणि ते इंसुलिन ही साखर शरीरातल्या पेशींना पाठवतं व शरीराला ऊर्जा मिळते.

डिस्क्लेमर: वरील माहितीमधून सांगितलेल्या चाचण्या रूग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कराव्या. तुम्हाला असलेल्या अनेक समस्यांमुळे काही वेळी तज्ज्ञ एखादी विशिष्ट चाचणीही करायला लावू शकतात.