World Diabetes Day: या आठ कारणांनी वाढतं तुमचं ब्लड शुगर लेवल; वेळीच सावध व्हा नाहीतर...

भविष्यातील तुम्हाला उद्भवणारा धोका टाळण्यासाठी तुम्ही वेळीच ही कारणं जाणून सावध व्हावे
World Diabetes Day
World Diabetes Dayesakal
Updated on

Health Tips: मधूमेहाचा त्रास एकदा सुरू झाला की आयुष्यभर त्यातून सुटका नाही असे मानले जाते. जीवनशैलीतील बदल, तुमची झोप, तुमचा आहार या सगळ्यांचा देखील प्रभाव तुमच्या आरोग्यावर होत असतो. ब्लड शुगर लेवल वाढण्याची काही कारणे अनेकांना माहिती नाहीत. भविष्यातील तुम्हाला उद्भवणारा धोका टाळण्यासाठी तुम्ही वेळीच ही कारणं जाणून सावध व्हावे.

मधुमेह हा एक सामान्य चयापचय विकार आहे जो तेव्हा होतो जेव्हा तुमचे शरीर पुरेसे इंसुलिन तयार करू शकत नाही किंवा ते कार्यक्षमतेने वापरू शकत नाही. साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत निरोगी बदल करण्याचा सल्ला दिला जातो कारण ते तुमची ऊर्जा पातळी आणि मूड सुधारण्यास मदत करतात.

1. अति सूर्यप्रकाश किंवा उष्णतेचा संपर्क

सनबर्नमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. रूग्णाला अतिघामामुळे मूत्रपिंड अधिक पाणी धरून ठेवते. त्यामुळे इन्सुलिनची संवेदनशिलता कमी होते. सनबर्नच्या अस्वस्थतेमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असते आणि तणावामुळेही रक्तातील साखरेची पातळी वाढते.

2. कॉफी आणि बाजारातील गोड पदार्थ

कॉफी आणि बाजारातील गोड पदार्थांमुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. तुम्ही साखरेशिवाय कॉफी घेतली तरीही, कॅफीन काही लोकांच्या शरीरात स्वतःहून साखर तयार करण्यास प्रवृत्त करू शकते. (Diabetes)

3. झोपण्याच्या अनियमित पद्धती

एका रात्रीची अपुरी झोप देखील तुमचे शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी करू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे लेप्टिनची पातळी वाढते, हा हार्मोनमुळे आपल्याला भूक असतानाही पोट भरल्यासारखे वाटते.

World Diabetes Day
Should Drink Water Before Sleep : रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यावे का?

4. नाश्ता टाळणे

मधूमेहाच्या रूग्णांना वेळेवर जेवण व नाश्ता घेणे फार महत्वाचे असते. तुम्ही अवेळी सकाळचा नाश्ता केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहाणे कठीण ठरते.

5. हॉर्मोनल इंबॅलेंस

तुम्हाला मधूमेहाचा त्रास असो किंवा नसो पहाटेच्या वेळी तुमचे हॉर्मोन्स असंतुलित होऊ शकतात. त्यामुळे रक्तातील पातळीत वाढ होऊ शकते.

World Diabetes Day
Sleep Disorder In Kids: लहान मुलांमध्ये देखील आढळते स्लीप डिसऑर्डर, वाचा एका क्लिकवर लक्षणे अन् उपाय

6. डिहायड्रेशन

डिहायड्रेशनमुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळेही तुमच्या शरीरातील शुगर ब्लड लेव्हलच्या पातळीत वाढ होते.

7. नेझल स्प्रे

नेझल स्प्रेमध्ये असे घटक असतात ज्यामुळे तुमचे यकृत रक्तातील शुगर लेवल वाढवते.

8. डिंक रोग

मधूमेहाप्रमाणेच रक्तातील ब्लड शुगर लेवल वाढवणारा हा एक रोग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com