World Diabetes Day | जागतिक मधुमेह दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मधुमेह दिन

जागतिक मधुमेह दिन

नागपूर : मधुमेह ही व्याधी आज सर्वांच्या परिचयाची झाली असून; या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष असे, ६० व्या वर्षांच्या सरासरी आयुर्मानात पडणाऱ्या या आजाराचा विळखा आता तिशीतच पडू लागला आहे. मधुमेहाचे प्रमाण वाढते असल्याने १० लाख व्यक्तींची मधुमेह चाचणी एका दिवसात करण्यात आली. यात ९ टक्के लोकं गोड आजाराच्या विळख्यात अडकले असून त्यांना याची माहितीच नसल्याचे चाचणीतून उघड झाले. एका दिवसाच्या तपासणी मोहिमेतून ९६ हजार व्यक्तींना मधुमेह असल्याचे निदान झाले. जिल्ह्यात सुमारे ३ लाखावर मधुमेही असण्याची शक्यता वर्तविली आहे.

हेही वाचा: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या तालुक्यात जेवणावळी

‘रिसर्च सोसायटी फार स्टडी ऑफ डायबेटिज इन इंडिया’ या संस्थेतर्फे २९सप्टेंबर २०२१ रोजी मधुमेह जागरूकता चळवळीतून या गोड आजाराचा संदेश देण्यासाठी एका दिवसात देशात १० लाख ७० हजार व्यक्तींची तपासणी झाली. यांना मधुमेह आहे की, नाही याची माहिती नव्हती. अलीकडे वैद्यकीय मार्गदर्शनाचा अभाव, मधुमेहाचे व्यवस्थापन करण्याकडे केलेले दुर्लक्ष यामुळे अवघ्या २५ ते ३५ वर्षे वयोगटातील युवापिढी तसेच ‘टाइप-१’ या मधुमेहाच्या व्याधीत किशोरवयीन आणि लहान मुले सापडलेली आहेत. मुलांच्या वाढत्या लठ्ठपणामुळे झपाट्याने वाढ होत आहे. ‘लठ्ठपणा’, ‘बदलती जीवनशैली’ आणि ‘आनुवंशिकता’ या तीन कारणांमुळेच मधुमेह दिवसेंदिवस वाढत आहे. पुरुषांच्या तुलनेत मधुमेहींमध्ये महिलांची संख्या अधिकतर आहे. बदलत्या काळात मधुमेहाचा धोका दुपटीने वाढला आहे.

हेही वाचा: बागेत मोहोराचे पूजन करताना आंबा बागायतदार संदीप डोंगरे

अंधत्वाचा धोका : डॉ. कविता धाबर्डे

मधुमेहामुळे डोळे जाण्याची भीती असते. डोळ्यांपुढे काहीतरी तरंगल्यासारखे वाटते. काळे ठिपके दिसतात. दृष्टिपटलाची बाधा होऊन नजर कमी होते. आतील द्रवामधील रक्तस्रावामुळे दृष्टिपटल सरकल्यासारखे वाटते. रंग ओळखण्यात अडचण निर्माण होते. वारंवार चष्म्याचा नंबर बदलतो. मधुमेही व्यक्तीमध्ये मोतीबिंदू तरुण वयात होतो. एकाच वस्तूच्या दोन प्रतिमा दिसतात. काचबिंदू होतो. यामुळे दृष्टिपटलाची वारंवार तपासणी करून घ्यावी, आहारात डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार बदल करून घ्यावे, असे मेडिकलच्या नेत्ररोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. कविता धाबर्डे म्हणाल्या.

मुलांमधील खिलाडूवृत्ती कमी झाली. खुर्चीत बसून हाती रिमोट घेत त्याची नजर टीव्हीच्या स्क्रीनवर असते. डोळ्यांच्या आजारासोबत लठ्ठपणा वाढतो. आणि त्याच्या सोबतीला जणू खेळण्यासाठीच मधुमेह येतो. यावर नियंत्रणासाठी कमी खा, जास्त चाला. चांगली झोप घ्या.

-डॉ. सुनील गुप्ता, मधुमेहतज्ज्ञ, नागपूर.

loading image
go to top