निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या तालुक्यात जेवणावळी | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषदेची निवडणूक अद्याप जाहीर झाली

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या तालुक्यात जेवणावळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : सोलापूर विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे अनेक मतदारांची चलबिचल सुरू असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषदेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली. तरी सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या तालुक्यात जेवणावळी मात्र सुरू झाल्या.

सात महिन्यापूर्वी झालेल्या पंढरपुर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला ही जागा राखता आली नाही. भाजप उमेदवार समाधान आवताडे निसटत्या मताने विजयी झाले सध्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकी बरोबर दामाजी कारखान्याची निवडणूक ही तालुक्यांमध्ये महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. त्या दृष्टीने अनेक राजकीय नेत्यांनी कंबर कसण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: नागपूर : कार्यालयात सहकारी महिलेशी अश्‍लील चाळे

यंदा तालुक्याला अतिवृष्टीची मदत मिळाली नाही, ग्रामीण रस्ते,पिण्याचे पाणी,आरोग्य,वीज समस्या गंभीर असून त्याबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षाला आवाज उठवून न्याय देता आला नसल्याचे चित्र आहे. शासकीय कार्यालयातत ग्रामीण जनता त्याच्या कामासाठी हेलपाट्याने त्रस्त झाली आहे.

नगरपालिका व जिल्हा परिषदेसाठी काहींनी आरक्षण सोडती वर लक्ष ठेवले तर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलल्यामुळे अनेक मतदारांना फायदा होणार नसल्यामुळे त्यांच्यात नाराजी पसरली असतानाच जिल्हा परिषदेची निवडणूक व त्या संदर्भातील आरक्षण सोडत जाहीर झाली नसताना. देखील तालुक्यात मतदारसंघ ताब्यात घेण्याच्या दृष्टीने गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली. दिवाळीतील गोड गोड शांत होऊन श्रमपरिहार होण्याच्या दृष्टीने हुलजंती जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवाराने मरवडे येथे या पंचायत समिती गणात येणार्‍या प्रमुख कार्यकर्त्यांसाठी जेवणावळीचे आयोजन करण्यात आले.

हेही वाचा: नागपूर : हिरवा वाटाणा २५०, कोथिंबीर १५० रूपये किलो!

त्याच उमेदवाराकडून आता हुलजंती पंचायत समिती गणात ही जेवणावळ दिली जाणार आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधी सध्या जेवणावळीला उत येवू लागला. त्यामुळे हा संभाव्य उमेदवार सध्या आजमितीस राष्ट्रवादीकडून इच्छुक आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याकडे उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टीने ताकद लावली. त्याच्या समर्थकांनी जेवणानंतर संभाव्य उमेदवारीबाबत राष्ट्रवादीने दखल नाही. घेतली तर काँग्रेसकडून लढण्याची तयारी ठेवा. असा सल्ला अनेक कार्यकर्त्यांनी दिला त्यामुळे आरक्षण आणि निवडणूक जाहीर होण्याआधी या उमेदवाराच्या निवडणूक तयारी ही चर्चा मात्र हुलजंती जि.प गटात सुरू झाली.

loading image
go to top