World Health Day 2024 : निरोगी आरोग्यासाठी योग्य जीवनशैली महत्वाची, तुमच्या कामी येतील 'या' सोप्या टिप्स

World Health Day 2024 : आज जागतिक आरोग्य दिन आहे. दरवर्षी ७ एप्रिलला हा जागतिक आरोग्य दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
World Health Day 2024
World Health Day 2024esakal
Updated on

World Health Day 2024 : सध्याचे धावपळीचे जीवन, बिघडलेला आहार, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. या समस्या टाळण्यासाठी मग औषध-गोळ्यांची मदत घेतली जाते. परंतु, जर या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर याच आरोग्याच्या समस्या गंभीर रूप धारण करतात. त्यामुळे, या समस्या टाळण्यासाठी निरोगी आरोग्य राखणे फार महत्वाचे आहे.

आज जागतिक आरोग्य दिन आहे. दरवर्षी ७ एप्रिलला हा जागतिक आरोग्य दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आरोग्याप्रती जागरूक राहण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी लोकांना प्रेरित करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. आज या जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण उत्तम आरोग्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

World Health Day 2024
Yoga Tips : रोजच्या धावपळीमुळे हातापायांमध्ये वेदना जाणवतात? मग, 'या' योगासनांच्या सरावामुळे मिळेल आराम

झोप आहे महत्वाची

अनेकदा आपण निरोगी आरोग्यासाठी केवळ संतुलित आहाराकडे आणि व्यायामकडे लक्ष देतो. परंतु, या दोन्ही गोष्टींसोबत झोप देखील आपल्या आरोग्यासाठी तितकीच महत्वाची आहे. पुरेशी झोप आणि विश्रांती घेतली नाही की, याचा आरोग्यावर परिणाम होतो.

निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने रोज किमान ६-७ तासांची पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. जर तुमची झोप व्यवस्थित झाली नाही, तर मधुमेह, पित्त आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे, निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप अवश्य घ्या.

योगामुळे आरोग्य राहील उत्तम

सध्याच्या आधुनिक काळात योगा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी नियमितपणे योगा करणे महत्वाचे आहे. दररोज विविध योगासनांचा सराव केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते.

यासोबतच शारिरीक आणि मानसिक क्रियाकल्पांसाठी पुरेशी तयारी होते. थोडक्यात निरोगी आणि तंदुरूस्त शरीराचा पाया घालण्यासाठी योगा उपयुक्त आहे. नियमितपणे योगा केल्याने झोप चांगली येते आणि शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होते. त्यामुळे, निरोगी आरोग्य राखण्यासाठी योगाची मदत अवश्य घ्या.

संतुलित आहार आवश्यक

निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप ही त्रिसूत्री फार महत्वाची आहे. उत्तम आरोग्यासाठी आहारात सर्व पोषकघटकांचा समावेश असणे फायदेशीर आहे. तुमचा रोजचा आहार हा संतुलित असायला हवा.

या संतुलित आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे यांचा समावेश असायला हवा. यासोबतच प्रथिने, पोषकतत्वे, कर्बोदके, व्हिटॅमिन्स, खनिजे इत्यादी घटकांनीयुक्त असलेले जेवण महत्वाचे आहे. जर तुम्हाला निरोगी आरोग्य जगायचे असेल, तर तुमचा आहार संतुलित हवा.

World Health Day 2024
Kidney Health : किडनीच्या समस्यांमुळे त्रस्त आहात? मग, आहारात 'या' खाद्यपदार्थांचा करा समावेश

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com