World Leprosy Day 2024 : आहारात ‘या’ पोषकघटकांचा समावेश करणे कुष्ठरूग्णांसाठी ठरेल फायदेशीर

आज जागतिक कुष्ठरोग दिन आहे. या दिनानिमित्त आज आपण कुष्ठरोगाने पीडित असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहाराची काळजी कशी घ्यायची आणि आहारात कोणत्या घटकांचा समावेश करायचा? त्याबद्दल जाणून घेऊयात.
World Leprosy Day 2024
World Leprosy Day 2024esakal

World Leprosy Day 2024 : पूर्वीइतका कुष्ठरोग हा जगभरात पसरलेला नाही. मात्र, अजूनही जगाच्या अनेक भागांमध्ये या कुष्ठरोगाने पीडित असलेले रूग्ण आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात २ लाखांपेक्षा अधिक रूग्ण हे कुष्ठरोगाने त्रस्त आहेत. यातील अनेक प्रकरणे ही आशिया आणि आफ्रिका खंडातील आहेत.

कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य रोग असून तो मायकोबॅक्टेरियम लेप्री या जिवाणूमुळे होतो. हा आजार प्रामुख्याने त्वचा, डोळे, नाक आणि श्वसनमार्गावर परिणाम करतो. जर तुम्ही यावर वेळीच उपचार न केल्यास तुम्हाला कायमचे अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे, यावर लवकरात लवकर उपचार करणे गरजेचे असते.

आज जागतिक कुष्ठरोग दिन आहे. या दिनानिमित्त आज आपण कुष्ठरोगाने पीडित असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहाराची काळजी कशी घ्यायची आणि आहारात कोणत्या घटकांचा समावेश करायचा? त्याबद्दल जाणून घेऊयात.

कुष्ठरोगाच्या आजारावरील उपचारांमध्ये आहार आणि आहाराद्वारे शरीराला मिळणारे योग्य पोषण महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे, या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तींनी आहारात खालील घटकांचा समावेश करणे फायद्याचे ठरते. या घटकांमुळे रूग्णाला ऊर्जा मिळते आणि या आजाराशी लढण्यात मदत मिळते.

World Leprosy Day 2024
Health Care : हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे ब्राऊन राईस, आजच करा आहारात समावेश

व्हिटॅमिन ए

गाजर, पपई आणि रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए चे भरपूर प्रमाण आढळून येते. या घटकांमध्ये आढळून येणारे व्हिटॅमिन ए हे तोंड, पोट, आतडे आणि श्वसन प्रणालीमधील त्वचेच्या पेशींचे संरक्षण करण्यास मदत करते आणि त्यांना निरोगी ठेवते. त्यामुळे, व्हिटॅमिन ए ने युक्त असलेल्या या खाद्यपदार्थांचा आहारात जरूर समावेश करा.

मॅग्नेशिअम

नाचणी, ज्वारी, सोयाबीन, विविध प्रकारची कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, बदाम, काजू, सब्जा आणि भोपळ्याच्या बिया इत्यादी घटकांमधून मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात आढळून येते. मॅग्नेशिअम आपल्या शरीरातील स्नायूंच्या कार्यात मदत करते. तसेच, मज्जातंतू आणि इम्युनोग्लोबुलिन वाढवून आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते.

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी हे आपल्याला सूर्यप्रकाशामधून भरपूर प्रमाणात मिळते. यासोबतच अंडी आणि मशरूम्समध्ये ही व्हिटॅमिन डी चा समावेश असतो. व्हिटॅमिन डी हे शरीराला झालेला संसर्ग नियंत्रित करण्यास मदत करते आणि जळजळ टाळण्यास मदत करते.

World Leprosy Day 2024
Vitamins Deficiency : कोणत्याही गोष्टीवर फोकस करताना अडचणी येतात? मग,'या' व्हिटॅमिन्सची असू शकते कमतरता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com