
थोडक्यात:
पहिलं इंप्रेशन बहुतेक वेळा स्माईलमुळे तयार होतं आणि त्यात दातांची महत्त्वाची भूमिका असते.
पिवळसर, वाकडे किंवा डाग पडलेले दात व्यक्तीचं इंप्रेशन खराब करू शकतात.
स्वच्छ, मजबूत आणि योग्य आकारातील दात स्माईलला आकर्षक बनवून आत्मविश्वास वाढवतात.
Home Remedy for Crooked and Stained Teeth: "फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन" ही म्हण आपण नेहमी ऐकतो, आणि अनेकदा हे पहिलं इंप्रेशन तुमच्या स्माईलमुळे तयार होतं. मात्र, केवळ हसूच नाही तर त्या हसण्यामध्ये दिसणारे दातही तितकेच महत्त्वाचे असतात. म्हणूनच, जेव्हा दात पिवळसर, वाकडे किंवा डाग पडलेले असतात, तेव्हा तुमचं इंप्रेशन खराब होण्याची शक्यता वाढते.
मजबूत, स्वच्छ आणि योग्य आकारातील दात तुमच्या स्माईलला देखणं बनवतात. पण जर दात पिवळसर, छोटे, डाग असलेले, किंवा वाकडे-तिकडे असतील, तर ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात.