Yoga For Heart Health : ह्रदयविकारापासून दूर राहायचे असेल तर आठवड्यातून एकदातरी व्यायाम कराच, वाचा फायदे

ज्या लोकांच्या जीवनशैलीत व्यायामाचा समावेश होता, त्यांना हृदयविकाराचा धोका इतर लोकांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले.
Yoga For Heart Health
Yoga For Heart Healthesakal

Yoga For Heart Health : हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार ज्या लोकांनी आठवड्यातून एकदा व्यायाम केला होता. त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर यासारख्या आजारांचे प्रमाण कमी आहे.

या संशोधनात ९ हजार लोकांची दिनचर्या तपासण्यात आली. ज्या लोकांच्या जीवनशैलीत व्यायामाचा समावेश होता, त्यांना हृदयविकाराचा धोका इतर लोकांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले.

कोणता व्यायाम करावा

व्यायामत जॉगिंग, सायकलिंग आणि पोहणे यासारखे कोणतेही हलके व्यायाम समाविष्ट आहेत. या प्रकारचा व्यायाम केल्याने शरीराचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे कार्य मजबूत राहते. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. एक-दोन दिवसांच्या व्यायामानेही हृदयातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहते. हृदयविकाराचा धोका कमी असतो.

Yoga For Heart Health
Yoga For stress : फार स्ट्रेस आहे? स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी करा हा योगा, जाणून घ्या योग्य पद्धत

खानपानात बदल आवश्‍यक

याबाबत कार्डिओलॉजिस्ट सांगतात की, गेल्या काही वर्षांत लोकांच्या खाण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला आहे. आता लोक जास्त फास्ट फूड खातात. जीवनशैलीही अत्यंत वाईट झाली आहे. रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय झाली आहे. या सर्व गोष्टींमुळे हृदयाचे आजार वाढत आहेत. लोकांना त्यांच्या आहाराची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. योग्य खाल्ल्याने हृदयविकार बऱ्याच प्रमाणात टाळता येईल.

Yoga For Heart Health
Minor Heart Attack : अपूर्ण झोप तुम्हाला देऊ शकते हृदयविकाराचं गिफ्ट, वेळीच काळजी घ्या!

छंद जोपासावा

हृदयाची तंदुरुस्ती दिनचर्या व ताणतणावाशी संबंधित आहे. त्यामुळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. यासाठी दैनंदिन कामाशिवाय पुस्तके वाचन, गाणे ऐकणे गायन, बागकाम, मुलांसोबत खेळणे, मित्रांसोबत गप्पा, विनोदी मालिका पाहणे, चित्रपट व सामाजिक तसेच आवडीचा कामात भाग घेतल्यास मनावरील ताण कमी होतो. हृदय सुदृढ राहते.

(टिप - या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com