

Youth as the Energy to Cross the Ocean of Life
sakal
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)
नदीच्या पाण्यात पोहायचे असो किंवा समुद्रात पोहायचे असो... पोहण्याची कला अवगत असावीच लागते, खूप शक्ती व स्टॅमिना असावा लागतो. थोडक्यात काय, तर समुद्र तरून जायचे असले मनुष्य तरुणच असावा लागतो. जीवनाचा अथांग महासागर हा तर अति दुस्तर. त्याला पार करायचे असेल तर तारुण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून कुठल्याही प्रकारे म्हातारपणाला जवळ येऊ न देता तरुण राहणे आवश्यक असते.