
आर्थिक वर्ष 2021-22 चा बजेट सादर होण्यास आता काही तासांचा कालावधी राहिला आहे.
Union Budget 2021-22 आर्थिक वर्ष 2021-22 चा बजेट सादर होण्यास आता काही तासांचा कालावधी राहिला आहे. बजेट देशाची पहिली पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करतील. याआधी इंदिरा गांधींनी अंतरिम अर्थमंत्री म्हणून बजेट सादर केला होता. देशाचे सर्वसाधरण बजेट किंवा अंतरिम बजेट ( निवडणुकीच्या वर्षी सादर केले जाणारे बजेट) केंद्रीय अर्थमंत्री सादर करतात. पण काही प्रसंगी पंतप्रधानांनीही बजेट सादर केला आहे. सर्वातआधी देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरु यांनी बजेट सादर केला होता. असे काही अर्थमंत्री होऊन गेले आहेत, जे बजेट सादर केल्यानंतर देशाचे पंतप्रधान झाले आहेत.
Budget 2021: शेतकरी-कृषी उद्योजकांना अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा
पंतप्रधान असताना कोणी सादर केलाय बजेट
जवाहरलाल नेहरु- देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी या प्रथेची सुरुवात केली होती. त्यांनी 1958 मध्ये सर्वसाधारण बजेट सादर केला होता. तत्कालीन अर्थमंत्री टीटी कृष्णामाचारी यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्याजागी नेहरुंना बजेट सादर करावा लागला. कृष्णामाचारी यांनी मुंधडा घोटाळ्याप्रकरणी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
यूनियन बजेटचा काय आहे इतिहास? कशी असते संपूर्ण प्रक्रिया?
इंदिरा गांधी- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून 1970 मध्ये बजेट सादर केला होता. त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर पद सांभाळलं होतं. मोरारजी त्यावेळी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्रीपद सांभाळत होते. त्यांच्याकडून अर्थमंत्रीपद काढून घेण्यात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. याच काळात इंदिरा गांधींनी 14 बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतला होता.
Budget 2021:बजेटमध्ये पेट्रोल-डिझेलचं काय होणार? पाहा व्हिडिओ
राजीव गांधी- पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी 1987 मध्ये देशाचे सर्वसाधारण बजेट सादर केले होते. त्यांनी तत्त्कालीन अर्थमंत्री वीपी सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर पद सांभाळले होते. धीरुभाई अंबानी आणि अमिताभ बच्चन यांच्यासह अनेत सस्पेक्टेड टॅक्स इवेडर्सवरील (टॅक्स चोरी) हाय फ्रोफाईल रेड प्रकरणी वीपी सिंह यांना पदावरुन हटवण्यात आलं होतं.
मोरारजी देसाई यांच्या नावावर सर्वाधिक बजेट सादर करण्याचा रिकॉर्ड आहे. पण, त्यांनी पंतप्रधान बनल्यानंतर बजेट सादर केला नाही. वीपी सिंह यांनीही राजीव गांधी सरकारच्या काळात अर्थमंत्री म्हणून बजेट सादर केला, पण ते पंतप्रधान झाल्यानंतर अर्थमंत्री मधु दंडवते होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी 30 वर्षांपूर्वी देशाची नीती बदलणार बजेट सादर केला होता. 15 वर्षानंतर पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी बजेट सादर केला नाही.