esakal | 'नाडा'च्या सुनावणीस सेहवागची अनुपस्थिती 
sakal

बोलून बातमी शोधा

Sehwag's absence from hearing on NADA

'नाडा'च्या सुनावणीस सेहवागची अनुपस्थिती 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तेजकविरोधी सुनावणी समितीत समावेश केल्यानंतरही वीरेंद्र सेहवाग अजून एकाही सुनावणीस उपस्थित राहिला नसल्याचे समोर आले आहे. 

गेल्या वर्षी 9 नोव्हेंबरला सेहवागचा नऊसदस्यीय उत्तेजकविरोधी सुनावणी समितीत समावेश करण्यात आला होता. यात न्यायाधीश आर. वी. ईश्‍वर हे मुख्य असून, वकील विभा दत्त मखिजा, दिल्लीचा माजी कर्णधार विनय लांबा, डॉ. नवीन दंग आणि डॉ. हर्ष महाजन यांचा समावेश आहे. 

उत्तेजक सेवन प्रकरणात 'नाडा'ने केलेल्या कारावाईला आव्हान देण्यासाठी देशातील उत्तेजकविरोधी सुनावणी समिती ही सर्वोच्च मानली जाते. मात्र, नव्या समितीची नियुक्ती झाल्यापासून सेहवाग एकाही सुनावणीस उपस्थित राहिलेला नाही. सेहवागने समितीचा राजीनामा दिलेला नाही. तो अजूनही समितीचा एक भाग आहे. अर्थात, तो आतापर्यंत एकाही सुनावणीस उपस्थित राहिलेला नाही, हेदेखील सत्य आहे. अन्य सदस्य एकापेक्षा अधिक सुनावणीस उपस्थित राहिले आहेत. 

या समितीने उपस्थितीविषयी विचारलेल्या एकाही संदेशाला सेहवागने साधे उत्तरही दिलेले नाही. विशेष म्हणजे नव्या समितीसमोर पॉवरलिफ्टर सरिता राणी, बॉक्‍सिंग खेळाडू रंजन मुमगी आणि व्हॉलिबॉल कुमार खेळाडू आयुष यांच्या सुनावणी झाल्या आहेत. 
'नाडा'च्या संकेतस्थळावर मात्र या सुनावणी सुरू होण्यापूर्वीच सेहवागने उपलब्धतेविषयी सवलत मागितल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

loading image
go to top