भविष्य

मेष:
तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहील. अनेक बाबतीत स्वास्थ्य व समाधान लाभेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील.
वृषभ:
तुमच्यातील चिकाटी वाढणार आहे. भावंडांचे सौख्य लाभेल. नातेवाईक भेटतील.
मिथुन:
व्यवसायातील उधारी, उसनवारीची कामे होतील. प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. काहींना गुप्त वार्ता समजतील.
कर्क:
तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. दैनंदिन कामे विनासायास होतील.
सिंह:
विनाकारण खर्च होईल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.
कन्या:
प्रियजनांचा सहवास लाभेल. मित्रमैत्रिणींचे व सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. तुमचा उत्साह विशेष असणार आहे.
तूळ:
नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास मार्गी लागणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा राहील.
वृश्चिक:
आरोग्य उत्तम राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना गुरूकृपा लाभेल.
धनु:
मानसिक अस्वस्थता राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामामध्ये चूक होण्याची शक्‍यता आहे. मनोबल कायम ठेवावे.
मकर:
जिद्द वाढणार आहे. चिकाटीने कामे मार्गी लावणार आहात. आज तुम्हाला अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल.
कुंभ:
मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाईल.
मीन:
काहींना विविध लाभ होतील. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. धनलाभाची शक्‍यता आहे.
रविवार, ऑक्टोबर 20, 2019 ते शनिवार, ऑक्टोबर 26, 2019
मेष:
भावरम्य क्षण अनुभवाल! तुमच्या राशीला हा सप्ताह सप्तमस्थ शुक्रभ्रमणातून अतिशय मंगलमय राहील. वैवाहिक जीवनातले भावरम्य क्षण अनुभवाल! भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २३ ते २५ ऑक्‍टोबर हे दिवस कृतार्थतेचा अनुभव देणारे. मात्र, शनिवारी वाहन चालवताना काळजी घ्या. अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींचा मानसन्मान होईल.
वृषभ:
व्यवसायात तेजी राहील सप्ताहारंभ व्यावसायिक धनवर्षावाचा. मोठे व्यवहार होतील. व्यावसायिक तेजीचा भर राहील. ता. २३ व २४ या दिवशी मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अलौकिक फळं मिळतील. गुरुभ्रमणाचा अंतिम अध्याय खणखणीत शुभफळं देईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात शुक्रवारी शुभ घटना घडतील. धन्यता अनुभवाल.
मिथुन:
वैवाहिक जीवनात भाग्योदय यंदाच्या दिवाळीची पूर्वसंध्या मोठी भावरम्य राहील. सप्ताहाची सुरवात घरातल्या तरुणांच्या भाग्योदयाची. काहींचे वास्तुप्रवेश. वैवाहिक जीवनातला भाग्योदय धन्यतेचा अनुभव देईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ व २५ हे दिवस मोठे झगमगाटाचे. सेलिब्रिटी व्हाल!
कर्क:
श्रीमंतांच्या यादीत जाल! यंदाच्या दिवाळीतली भाग्यवान रास. गुरुभ्रमणाचा अंतिम अध्याय एक प्रकारचा राज्याभिषेक घडवून आणेल. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्ती श्रीमंतांच्या यादीत जातील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ चा शुक्रवार कौटुंबिक समारोहातून धन्यतेचा अनुभव देणारा. शनिवारी दुखापतीपासून जपा.
सिंह:
दैवी गुण प्राप्त होतील! हा सप्ताह दिवाळीचा उत्तम ट्रॅक पकडेल! यंदाची दिवाळी तरुणांना नटण्या-मुरडण्याची! व्यावसायिक भाग्योदयातून मोठी रोषणाई कराल. यंदाच्या दिवाळीत पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती दैवी गुणांनी संपन्न होत आहेत! ता. २३ ते २५ हे दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदले जातील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी चीजवस्तू जपाव्यात. हरवण्याची शक्यता.
कन्या:
फटाक्‍यांशी खेळ नको राशीचा मंगळ ग्रहांचा पट ताब्यात घेण्याच्या तयारीत राहील. नका खेळू फटाक्‍यांशी. बाकी, बुध-शुक्राची जोडगोळी व्यावसायिकांना ‘व्हिटॅमिन एम’ भरपूर पुरवेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना तजेला येईल. ता. २५ ची गुरुद्वादशी ‘खुल जा सिम्‌ सिम्’‌ करणारी. गुंतवणूक यशस्वी होईल.
तूळ:
उपासनेचा नवा अध्याय जीवनातल्या दीपोत्सवाची उत्तम तयारी करणार आहात. एका नव्या फॅशनचा अंगीकार कराल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना दीपावलीच्या पूर्वसंध्येला मोठे लाभ होणार आहेत. ता. २३ ते २५ हे दिवस एकूण झगमगाटी. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना आत्मतृप्तीचा अनुभव येईल. उपासनेचा नवा अध्याय सुरू होईल!
वृश्चिक:
या दिवाळीत स्वयंभू व्हाल! जीवनाच्या फील्डवर तुम्ही चांगलेच टिकून राहिले आहात. यंदाच्या शुक्रवारच्या गुरुद्वादशीला तुमच्या साधनेचं फळ तुम्हाला मिळणार आहे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ही दिवाळी स्वयंभू, स्वावलंबी बनवेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींचे मोठे करारमदार दिवाळीचा मुहूर्त साधून होतील. आजच्या रविवारी पाकीट सांभाळा.
धनु:
उत्तम नोकरीची चाहूल दिवाळीच्या पूर्वसंध्येचे सप्तरंग अनुभवाल! आजचा रविवार संध्याकाळी गाठीभेटींतून भाग्यबीजं पेरणारा. तरुणांना उत्तम नोकरीची चाहूल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींवर शुक्रकलांची उधळण! विवाहमेळाव्याला उपस्थित राहा. मोबाईल सतत चार्ज ठेवा! मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार नोकरीत कलहजन्य. सांभाळून राहा.
मकर:
प्रेमीजनांना उत्तम सप्ताह हा सप्ताह प्रेमवीरांना उत्तमच. राहा लव्हबर्ड्‌ससारखेच! ता. २२ व २३ हे दिवस सर्वच बाबतींत क्‍लिक होणारे. व्यावसायिकांना लाभच लाभ. यंदाची दिवाळी शुक्रकलांतून साजरी होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी तेज प्राप्त होईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल.
कुंभ:
कलाकारांना ग्लॅमर मिळेल दिवाळीच्या पूर्वसंध्येचा सप्ताह तुमच्यातल्या कलाकाराला जागवणारा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं ग्लॅमर मिळेल. वृद्धांना खूप जगावंसं वाटेल! शततारका नक्षत्राच्या व्यक्ती सतत अधिकार गाजवतील. आजचा रविवार कौटुंबिक भावरम्य सोहळ्याचा. इच्छुकांचा विवाह ठरेल.
मीन:
जास्त मनावर घेऊ नका! मंगळभ्रमणाचा अप्रत्यक्ष धाक राहील! भावनाप्रधान व्यक्तींनी जास्त मनावर घेऊ नये. नवपरिणितांनी काळजी घ्यावी. बाकी, ता. २१ ते २३ हे दिवस रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, नोकरी आणि विशिष्ट वैयक्तिक उपक्रमांतून भरघोस यशाचे. नूतन वास्तुप्रवेश. नवपरिणितांना गोड बातमी!

ताज्या बातम्या