भविष्य

मेष:
आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृषभ:
काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. निरुत्साहीपणा राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन:
काहींना विविध लाभ होतील. संततिसौख्य लाभेल. महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल.
कर्क:
अपेक्षित गाठीभेटी पडतील. मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
सिंह:
तुमच्या कार्यक्षेत्रात नवी दिशा सापडेल. सुसंधी लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल.
कन्या:
आरोग्याकडे लक्ष द्यावे. वाहने जपून चालवावीत. मनोबल कमी राहणार आहे.
तूळ:
अपेक्षित गाठीभेटी पडतील. तुमचा प्रभाव राहणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील.
वृश्चिक:
अनावश्‍यक कामात तुमचा वेळ वाया जाईल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. वाहने सावकाश चालवावीत.
धनु:
महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मकर:
प्रॉपर्टीसाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे.
कुंभ:
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो.
मीन:
कौटुंबिक जीवनात आनंद राहील. मनोबल उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो.
रविवार, ऑक्टोबर 13, 2019 ते शनिवार, ऑक्टोबर 19, 2019
मेष:
व्यावसायिक सरकारी कामं अश्‍विनी नक्षत्रव्यक्ती पौर्णिमेनंतर प्रचंड भरारी घेतील. ता. १४ आणि १५ हे दिवस सुवार्तांतून फ्लॅश न्यूजचे. विवाहयोग. व्यावसायिक मोठे पर्याय उपलब्ध होतील. ता. १८ चा शुक्रवार भरणी नक्षत्रास मोठा प्रवाही. व्यावसायिक सरकारी कामं. वादग्रस्त प्रकरणं मिटतील.
वृषभ:
वैवाहिक जीवनातून मोठ्या सुवार्ता पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र मृग नक्षत्रास उत्तमच. वैवाहिक जीवनातून मोठ्या सुवार्ता. भागिदारीतून लाभ. तरुणांना ता. १८ चा शुक्रवार नोकरीच्या मुलाखतींतून प्रभाव टाकणारा. रोहिणी नक्षत्रास गुरुवारची संकष्टी पुत्रचिंता घालवणारी. व्यावसायिक वसुली.
मिथुन:
विवाहविषयक गाठीभेटींतून प्रभाव टाकाल आजच्या पौर्णिमेनंतर मोठा फॉर्म गवसेल. मोठा स्प्रिंट माराल. अर्थातच एखादी मॅरेथॉन जिंकाल. ता. १४ आणि १५ हे दिवस मोठे चमत्कार घडवतील. बुध-शुक्रांची मोठी खेळी राहील. आर्द्रा नक्षत्राचं मार्केटिंग यशस्वी होईल. विवाहविषयक गाठीभेटींतून प्रभाव टाकाल. पुनर्वसू नक्षत्रास नोकरी मिळेल.
कर्क:
प्रीतीचं जाळं वीणाच सप्ताहातल्या शुभग्रहांचं पॅकेज आपणास भरभरून देईल. गृहिणींनी या सप्ताहाचा फायदा करून घ्यावा. आजची पौर्णिमा खरेदीची. पुष्य नक्षत्रास एकूणच सप्ताह ख्यालीखुशालीचाच. आश्‍लेषा नक्षत्रास ता. १८ चा शुक्रवार मोठ्या प्रेमस्पंदनातून हृद्य. प्रीतीचं जाळं वीणाच.
सिंह:
मुलाखतींसाठी तयार राहा पौर्णिमेनंतरचं ग्रहांचं फिल्ड धावसंख्या रचणारं. तरुणांनो, दिवस वाया घालवू नका. नोकरीच्या मुलाखतींसाठी तयार राहा. पूर्वा नक्षत्रव्यक्ती बाजीगर होतील. मघा नक्षत्रास ता. १४ चा सोमवार संध्याकाळी मोठा प्रसन्न. प्रियतमा भेटेल. उत्तरा नक्षत्रास शुक्रवार गोड सुखस्वप्नांचा.
कन्या:
तरुणांना मोठ्या संधी पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र भावनिक संदर्भातून खराब. हस्त नक्षत्रव्यक्तींनी दुष्टसंपर्क टाळावा. बाकी ता. १७ ते १९ हे दिवस शुभग्रहांच्या मंत्रालयातून मोठे साथ देणारे. तरुणांना मोठ्या संधी. नोकरीत प्रशंसा. चित्रा नक्षत्रास संकष्टीचा गुरुवार चंद्रोदयातून भाग्योदयाचा!
तूळ:
विशिष्ट कायदेशीर प्रश्‍न सुटतील पौर्णिमेनंतर स्वाती नक्षत्रव्यक्ती प्रत्येक वन-डे जिंकणार आहेत. वैयक्तिक उपक्रमांतून मोठं यश मिळेल. ता. १४ आणि १५ ऑक्टोबर हे दिवस मोठे शुभसंबंधित. सप्ताहाचा शेवट विशाखा नक्षत्रास भाग्यबीज पेरणारा. विशिष्ट कायदेशीर प्रश्‍न सुटतील. शुक्रवार विवाहयोगाचा.
वृश्चिक:
नोकरीतल्या घडामोडी प्रसन्न ठेवतील आजची पौर्णिमा ज्येष्ठा नक्षत्रास मोठी शुभसूचक. नोकरीतल्या घडामोडी प्रसन्न ठेवतील. अनुराधा नक्षत्रास ता. १८ चा शुक्रवार धनचिंता घालवणारा. आजच्या पौर्णिमेजवळ विवाहेच्छूंना पसंतीचे संकेत. संध्याकाळ मोठ्या मनोरंजनाची.
धनु:
वैयक्तिक उपक्रमांतून यश आजच्या पौर्णिमेचं फिल्ड शुभग्रहांच्या साथसंगतीचंच. पूर्वाषाढा नक्षत्र वैयक्तिक उपक्रमांतून यश देणारं. सप्ताह घरातल्या तरुणांच्या यशाचाच. मूळ नक्षत्रास सप्ताहात कायदेशीर गोष्टींतून त्रास. मात्र, सप्ताहाची सुरवात तरुणांना छानच. विवाहयोग. परदेशी व्हिसा.
मकर:
शुभग्रहांची साथ मिळेल पौर्णिमेनंतर श्रवण नक्षत्राची भरारी. शुभग्रहांची मंत्रालयं २४ तास आपल्यासाठी उघडी राहतील. घ्या कामं करून. ता. १४ ते १६ हे दिवस आपल्या राशीस अतिशय वेगवान राहतील. आजची पौर्णिमा धनिष्ठा नक्षत्रास जीवनातलं एक उत्तम पॅकेज बहाल करेल. शुक्रवार मोठा शुभ.
कुंभ:
परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय आजची पौर्णिमा सप्ताहाचा एक उत्तम ट्रॅक सुनिश्‍चित करेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास सप्ताह एकूणच धनसमृद्ध करणारा. ता. १७ आणि १८ हे दिवस विजयोत्सवाचे. परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय. सप्ताह वास्तूविषयक निर्णय घेईल. शततारका नक्षत्रास संकष्टीचा दिवस सुवार्तांतून धन्यतेचा.
मीन:
तरुणांचं भाग्य उलगडेल आजची पौर्णिमा शुभशकुनीच. रेवती नक्षत्रास घरातल्या सुवार्तांची पार्श्‍वभूमी ठेवणारी. घरातल्या तरुणांचं भाग्य उलगडेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्रास ता. १८ चा शुक्रवार यंदाच्या दिवाळीच्या सुखसमृद्धतेची अपूर्वता जाणवून देईल. शनिवारी प्रवासात जपा.

ताज्या बातम्या