भविष्य

मेष:
प्रॉपर्टीची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. कोणतीही महत्त्वाची कामे नकोत. आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील.
वृषभ:
हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीची कामे उरकून घ्यावीत.
मिथुन:
शुभ कामासाठी दिवस प्रतिकूल आहे. कामाचा ताण वाढणार आहे, दगदग वाढणार आहे. जबाबदारी वाढणार आहे.
कर्क:
तुमची पावले योग्य दिशेने पडत आहे. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. शासकीय कामे उरकून घ्यावीत.
सिंह:
वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आरोग्य चांगले राहणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल नवे स्नेहसंबंध जुळतील.
कन्या:
वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत.
तूळ:
कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय कामात यश लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.
वृश्चिक:
महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. व्यवसायाची उलाढाल वाढेल. जबाबदारी वाढणार आहे.
धनु:
वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायात अडचणी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका.
मकर:
काहींना प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ:
उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काही निर्णय धाडसाने घ्याल.
मीन:
हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. शासकीय कामात यश लाभेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल.
रविवार, डिसेंबर 8, 2019 ते शनिवार, डिसेंबर 14, 2019
मेष:
एका सुंदर पर्वाचा आरंभ भरणी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात विशिष्ट ऐतिहासिक निर्णय घेतील. अर्थातच जीवनाचं एक सुंदर पर्व सुरू होईल. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात होणारा शनी-शुक्र-प्लूटोचा त्रिग्रहयोग गुरुभक्तांना मोठी प्रचीती देईल. उद्याचा सोमवार अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय शुभलक्षणी.
वृषभ:
संतसंग कधीही सोडू नका राशीतील पौर्णिमा रवी-नेपच्यून योगातून विचित्र लोकांचा सहवास घडवू शकते. मात्र, तुम्ही संतसंग कधीही सोडू नका. बाकी, मृग नक्षत्राच्या तरुणांना पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात नोकरीतून परदेशगमन घडेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा चोरी-नुकसानीची. किल्ल्या जपा. दस्ताऐवज जपा.
मिथुन:
आध्यात्मिक वैभवाचा लाभ राशिचक्रातले अतिशय अद्भुत असे अनुभव घेणारी रास. शुक्र-शनी-प्लूटो हा त्रिग्रहयोग पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ज्ञानसंपन्न करेल. आध्यात्मिक वैभवाचा लाभ घडेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात नोकरीच्या मोठ्या संधी. स्त्रीच्या संमोहनात अडकू नका.
कर्क:
वातावरण प्रदूषित, काळजी घ्या ग्रहांचा ट्रॅक सप्ताहात जरा विरोधी राहील. वर बघून नव्हे तर खाली बघून चाला! सप्ताहातल्या रवी-नेपच्यून योगाच्या पार्श्‍वभूमीवरील पौर्णिमा आसमंतातील पशू-पक्षी, जीवजंतू आणि शेवटी माणसं यांच्या माध्यमांतून मोठी ॲलर्जिक किंवा प्रदूषित राहील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी रामरक्षा म्हणावी!
सिंह:
वाहन काळजीपूर्वक चालवा राशिचक्रातील पौर्णिमेची भव्य-दिव्य स्पंदनं खेचून घेणारी रास राहील. मात्र, वाहन चालवताना काळजी घ्या. एकूणच, या सप्ताहात विशिष्ट कला, छंद या माध्यमांतून तुम्हाला सूर गवसेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा मान-मरातबाची. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अपत्यलाभ.
कन्या:
कुलदेवतेचं स्मरण करा सप्ताहातला शनी-शुक्र-प्लूटो हा त्रिग्रहयोग काहींच्या संचितातल्या ठेवी मॅच्युअर करेल! घरातल्या पुत्र-पौत्रांच्या चिंता जातील. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र हस्त आणि चित्रा या नक्षत्राच्या व्यक्तींना सर्व उपक्रमांतून अनुकूलच राहील. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात कुलदेवतेचं स्मरण करा.
तूळ:
नोकरीत कर्तृत्व गाजवाल हा सप्ताह तुम्हाला मोठं धैर्य देईल. सप्ताहात चंद्रकलांचा प्रवास सुंदर राहील. उद्याचा सोमप्रदोष अतिशय शुभलक्षणी. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात मोठा भावोन्मेष अनुभवतील. नोकरीत कर्तृत्व गाजवाल. काहींचे वास्तुप्रवेश होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणात यश मिळेल. आई-वडिलांची काळजी घ्या.
वृश्चिक:
नोकरदारांना अनुकूल ग्रहमान पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शुभग्रहांची सरशी राहील. नोकरदारांसाठी सुंदर ग्रहमान. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींच्या संचितातल्या ठेवी या सप्ताहात मॅच्युअर होतील. पुत्र-पौत्रांची कार्यं ठरतील. मात्र, पत्नीचं हृद्गत ओळखा आणि तिला मान द्या. या सप्ताहात अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींची मोठी चैन राहील!
धनु:
कोर्टप्रकरणं मार्गी लागतील सप्ताहातली ग्रहसमीकरणं ऐतिहासिक स्वरूपाचीच आहेत. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात तरुणांचं ‘खुल ‌जा सिम् ‌सिम्’‌ होणार आहे. एखादं स्पर्धात्मक यश मिळेल. व्यावसायिक कोर्टप्रकरणं संपतील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठं यश देणारा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्हिसा मिळेल.
मकर:
नोकरीतली चिंता दूर होईल पौर्णिमेच्या आसपासच्या काळात नोकरीतली विशिष्ट चिंता दूर होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह वैयक्तिक उत्कर्षाचाच. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची धनचिंता सोमवारी दूर होईल. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात कलाकारांना यश-प्रसिद्धी मिळेल.
कुंभ:
गुंतवणुकीतून लाभ होईल या सप्ताहात चंद्रकलांचा उत्कर्ष पौर्णिमेच्या आसपासच्या काळात परमावधी गाठेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती शनी-शुक्र-प्लूटो या त्रिग्रहयोगाचा पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठा लाभ उठवतील. दुर्मिळ असे विवाहयोग येतील. काहींचा वास्तुप्रवेश. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ. कर्जवसुली होईल.
मीन:
कायदेशीर कटकटी संपतील शुभ ग्रहांची मंत्रालयं तुमच्यासाठी २४ बाय ७ खुली राहतील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा कराच. विशिष्ट कायदेशीर कटकटी संपतील. मात्र, घरगुती वादात पडू नका. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात वैवाहिक जीवनात काळजी घ्यावी. बाकी, रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमन घडेल. कलाकारांना यश-प्रसिद्धी मिळेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना स्नायुपीडेची शक्यता.

ताज्या बातम्या