भविष्य

मेष:
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
वृषभ:
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे.
मिथुन:
कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
कर्क:
कामानिमित्त प्रवास होतील. जिद्द व चिकाटीने कामे पूर्णत्वास न्याल.
सिंह:
आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नावलौकिक लाभेल.
कन्या:
आपली मते इतरांना पटवून द्याल. वैवाहिक जीवन सुखकर होईल.
तूळ:
खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणालाही जामीन राहू नका. वादविवाद टाळावेत.
वृश्चिक:
कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील.
धनु:
शासकीय कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे.
मकर:
काहींना गुरूकृपा लाभेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
कुंभ:
अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
मीन:
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
Sunday, September 20, 2020 to Saturday, September 26, 2020
मेष:
विशिष्ट स्वप्न पूर्ण होईल मेष : हा सप्ताह भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभम्रणाच्या पार्श्वभूमीवर अतिशय फलदायी. जीवनातील विशिष्ट स्वप्न पूर्ण होईल. ता. २३ व २४ या दिवशी महत्त्वाच्या कामांत यश मिळेल. तरुणांना नोकरीच्या मुलाखतीत यश. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना उष्णताजन्य विकार. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग.
वृषभ:
व्यवसायात तेजी येईल वृषभ : सप्ताहारंभ बुधाच्या विशिष्ट स्थितीतून तरुणांना निश्चितच प्रेरणादायी. मृग नक्षत्राच्या व्यक्तींच्या व्यवसायात तेजी येईल. पुत्रोत्कर्षाच्या आनंदात राहाल. बाकी, कृतिका नक्षत्रा व्यक्तींना ता. २४ ची अष्टमी वादग्रस्त पार्श्वभूमीवर गांभीर्य वाढवणारी. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना प्रेमप्रकरणातून त्रास.
मिथुन:
ध्येयावर लक्ष ठेवा मिथुन : राश्याधिपती बुधाच्या स्थितीतून अतिशय नावीन्यपूर्ण शुभफळ देणारा सप्ताह. तरुणांनी आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून मार्गक्रमण करावं. ता. २४ व २५ हे दिवस तुमच्या राशीला उत्तमच. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय. शनिवारी प्रकृतीची काळजी घ्या.
कर्क:
जुन्या गुंतवणुकीतून लाभ कर्क : शुकभ्रमणाच्या स्थितीमुळे आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २२ व २३ रोजी मोठ्या चमत्कारांची प्रचीती येईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ. खरेदी-विक्रीच्या व्यवहारांतून लाभ. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार विचित्र गाठी-भेटींचा. शुक्रवार मोठ्या सुवार्तांचा.
सिंह:
कायदेशीर प्रश्न सुटतील सिंह : मघा आणि उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात शुभग्रहांची उत्तम साथ. व्यावसायिक लॉकडाउन पूर्णपणे उठेल. विशिष्ट कायदेशीर प्रश्न सुटतील. शुक्रवार अतिशय शुभलक्षणी. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादा गॉडफादर भेटेल. परिचयोत्तर विवाहयोग.
कन्या:
अधिक लाभसंपन्न व्हाल! कन्या : चित्र नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह निश्चितच पर्वणीसारखा. अधिकमासात अधिक लाभसंपन्न व्हाल! स्वतंत्र व्यावसायिकांना ‘खुल जा सिम सिम’चा अनुभव येईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ चा शुक्रवार विजयोत्सवाचा. वाहन काळजीपूर्वक चालवावं. पैशाचं पाकीट सांभाळावं. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना पित्तप्रकोप.
तूळ:
आगीशी खेळू नका! तूळ : या सप्ताहात वक्री हर्षलचा ट्रॅक राहीलच. आगीशी खेळू नका. स्त्रीशी वाद टाळा. बाकी, विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसंदर्भात बुध, शुक्र आणि गुरू यांच्या विशिष्ट स्थितीमुळे ता. २३ ते २५ या कालावधीत मोठे चमत्कार घडतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती शुक्रवारी हृद्य प्रसंग अनुभवतील. मोठ्या सुवार्ता मिळतील.
वृश्चिक:
विजयी षटकार माराल! वृश्चिक : या सप्ताहात उष्णताजन्य विकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. पित्तप्रकोप होऊ शकतो. बाकी, या सप्ताहात शुभग्रहांचं ग्रास कोर्ट राहीलच. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती ता. २३ ते २५ या दिवशी या ग्रासकोर्टचा उत्तम लाभ उठवतील. विजयी-चौकार षटकार माराल! अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती पुत्रोत्कर्षानं धन्य होतील. कर्जमंजुरी मिळेल.
धनु:
नोकरीत प्रशंसा होईल धनू : सध्या तुम्ही गुरुभ्रमणाच्या स्पेशल कोट्यातून लाभ घेत आहात, त्यामुळेच अधिक मासातील हा सप्ताह तुम्हाला कार्यकर्तृत्वाद्वारे पुरुषोत्तम बनवणार आहे! नोकरीत प्रशंसा होईल. पतीच्या वा पत्नीच्या भाग्योदयानं प्रसन्न व्हाल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी, तर पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक प्रतिष्ठा मिळेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा शैक्षणिक भाग्योदय.
मकर:
स्त्रीवर्गानं काळजी घ्यावी मकर : वक्री हर्षलचा ट्रॅक पकडून हा सप्ताह उगवत आहे. भाजण्या-कापण्यासंदर्भात स्त्रीवर्गानं काळजी घ्यावी. घरातील लहान मुलांकडे लक्ष द्यावं. बाकी, सप्ताहातील शुभ ग्रहांची आघाडी ता. २२ व २३ रोजी चांगलीच क्रियाशील राहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह लाभदायक. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी सुवार्ता मिळतील.
कुंभ:
बॅंकेची कामं होतील कुंभ : या सप्ताहात काहींना त्वचाविकारामुळं त्रास होण्याची शक्यता. ॲलर्जी होणार नाही हे पाहावं. विशेषतः स्त्रीवर्गानं ता. २३ ते २५ या दिवशी सर्वतोपरी काळजी घ्यावी. परदेशी व्हिसा मिळेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची बॅंकेची कामं मार्गी लागतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना कला-छंदांतून प्रसिद्धीचा योग.
मीन:
नातेवाइकांशी जपून राहा मीन : हा सप्ताह स्त्रीवर्गाला संमिश्र फलदायी ठरेल. आजच्या रविवारी घरात वाद-विवादाची स्थिती निर्माण होऊ शकते. नातेवाइकांशी जपून राहा. बाकी, नोकरी-व्यवसायात अतिशय अनुकूल काळ. परदेशी व्यापार वाढेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना दिलासा. शुक्रवारी सुवार्तांचा. रेवती नक्षत्राच्या व्यक्ती झेप घेतील!

Tajya Batmya