भविष्य

मेष:
प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल.
वृषभ:
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात नवनवीन संधी लाभेल.
मिथुन:
खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना एखादी महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्यता आहे.
कर्क:
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह:
हाताखालील कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या:
संततीचे प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे पत्र व्यवहार पुढे ढकलावेत.
तूळ:
प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे.
वृश्चिक:
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना गुरूकृपा लाभेल.
धनु:
आर्थिक व्यवहार जपून करावेत. वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
मकर:
मानसिक अस्वस्थता जाणवेल. तुमचे मते इतरांना पटवून द्याल.
कुंभ:
वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.
मीन:
संततीसंदर्भात प्रश्‍न उद्भवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे.
Sunday, October 18, 2020 to Saturday, October 24, 2020
मेष:
शुभयोगांचा कालखंड गुरुभ्रमणाचं एक पर्व राहीलच. गुरु-शुक्राचा शुभयोग सप्ताहावर चांगलीच पकड ठेवेल. भरणी आणि कृत्तिका नक्षत्रास ता. २२ चा गुरुवार एक उत्तम शुभमुहूर्त. पुत्रोत्कर्षाच्या वार्ता कानावर धडकतील. अश्‍विनी नक्षत्रास ता. २३ व ता. २४ हे दिवस तिन्हीसांजसमयी जपण्याचे. घरात शांत रहा. वाद नकोत.
वृषभ:
नोकरीत बढतीची चाहूल मृग नक्षत्रास शुक्रभ्रमण नवरात्रात मोठं शुभफलदायी होईल. नोकरीत प्रशंसा, बढतीची चाहूल. परदेशी व्हिसा मिळेल. बाकी कृत्तिका नक्षत्रास रवि-शनी योगातून विचित्र नुकसानीचं भय. खरेदी-विक्रीचे व्यवहार जपून करा. रोहिणी नक्षत्रास सोमवारी स्त्रीकडून लाभ व कौतुक.
मिथुन:
कुसंगत त्रासदायक ठरेल सप्ताहातील मोठी लाभसंपन्न होणारी रास राहील. गुरु-शुक्र शुभयोगाची फळं अक्षरशः खेचून घ्याल. आसमंतातील देवता प्रसन्न राहतील. पुनर्वसू नक्षत्रव्यक्ती नक्षत्रलोकातून लाभ घेतील. आर्द्रा नक्षत्रास एखादी कुसंगत भोवेल. ता. २३ व ता. २४ हे दिवस एकूणच बेरंग करणारे.
कर्क:
व्यावसायिक लाभ शक्य सप्ताहातील केंद्रप्रतियोगातून बाधित होणारी रास. सार्वजनिक गोष्टींतून दूर रहा. अकारण नाक खुपसू नका. पुष्य व्यक्तींना वक्री बुधाची पार्श्‍वभूमी एखाद्या संशयपिशाच्चातून त्रास देईल. भावाबहिणींशी मतभेद. बाकी आश्‍लेषा नक्षत्रास शुक्र भ्रमणाची विशिष्ट स्थिती अपवादात्मक परिस्थितीतून व्यावसायिक लाभ देईल. आर्थिक संकट जाईल.
सिंह:
नवीन उपक्रमांचा प्रारंभ उत्तरा नक्षत्रास राशीतील शुक्रभ्रमण अंतिम टप्प्यात शुभ राहील. ता. २२ चा गुरुवार शुभयोगांतून छप्पर फाडके देणारा. तरुणांनो, लाभ घ्याच. पूर्वा नक्षत्रास ता. २१ व ता. २२ हे दिवस नवीन उपक्रमांचा शुभारंभ करतील. मघा व्यक्तींनी स्त्रीशी गैरसमज टाळावेत. शनिवार जपा.
कन्या:
भुरट्या चोरांपासून जपावं बुध-हर्षल योगाचा एक अंडरकरंट राहील. हवापाण्यातील संसर्ग जपा. सप्ताहात भुरट्या चोऱ्यांपासून जपा. उत्तरा नक्षत्रास क्वचित मातृ-पितृचिंता होऊ शकते. बाकी ता. २२, ता. २३ आणि ता. २४ हे दिवस शुभग्रहांच्या अखत्यारीतले. हस्त नक्षत्राची मौजमजा. धार्मिक प्रसन्नता.
तूळ:
दैवी प्रचितीचा अनुभव ग्रहांच्या केंद्रप्रतियोगांचा विचित्र व्हायरस राहील. घरी वा दारी क्रिया-प्रतिक्रिया सांभाळा. नवपरिणीतांनी जपावं. बाकी गुरु-शुक्राचा शुभयोग. विशाखा नक्षत्रास वैयक्तिक उत्सव, प्रदर्शनांतून केंद्रबिंदू करेल. स्वाती नक्षत्रास ता. १९ व ता. २० हे दिवस हृद्य राहतील. दैवी प्रचिती येईल.
वृश्चिक:
मुलाखतींमध्ये यश मिळेल गुरु-शुक्र शुभयोगाची नवरात्रातील शुभ स्पंदनं ज्येष्ठा नक्षत्रव्यक्ती खेचून घेतील. ता. २२ व ता. २४ ऑक्‍टोबर २० हे दिवस अतिशय सुगंधित राहतील. व्यावसायिक शुभारंभ होतील. तरुणांना हे दिवस नोकरीच्या मुलाखतीतून यश देणारे. बड्या हस्तींचं सहकार्य मिळेल. विशाखा नक्षत्रास शनिवार बेरंगाचा.
धनु:
तरुणाईला चांगलं यश नवरात्रातील शुभग्रहांच्या योगांतून लाभ घ्यालच. उमलत्या तरुणाईला हा सप्ताह दिलखेचक यश देणाराच! कोरोनाच्या काळातील नकारात्मक विचार ठेवूच नका. उत्तराषाढा व्यक्ती बाजी मारतील. ता. २० ते ता. २२ ऑक्‍टोबर २० हे दिवस आपल्या राशीस शुभसंबंधितच. मात्र, ता. २३ व ता. २४ हे दिवस बेरंग करणारे ठरू शकतात. अवधान ठेवाच.
मकर:
नोकरीतील राजकारणाचा त्रास साडेसातीचा एक टप्पा सुरू आहेच. रवि-शनी कुयोगाचं भाव ठेवूनच राहिलं पाहिजे. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट जपला पाहिजे. उत्तराषाढा व्यक्तींना अनपेक्षित घटनांतून विरोध होऊ शकतो. श्रवण नक्षत्रास नोकरीतील राजकारणातून त्रास. धनिष्ठा नक्षत्रास ता. २२ चा दिवस वैयक्तिक कौतुक सोहळ्याचा.
कुंभ:
अफलातून कल्पना सुचतील यंदाचं नवरात्र गुरु-शुक्र शुभयोगाच्या पार्श्‍वभूमीवर दैवी प्रचितीचंच. सप्ताहावर नेपच्यूनचापण प्रभाव राहील. अफलातून कल्पना सुचतील. मात्र, एकांतात राहिल्यावरच लाभ होतील. पूर्वा भाद्रपदा व्यक्ती सर्वोत्तम लाभ उठवतील. मात्र सप्ताहात जुगारसदृश व्यवहार टाळा. धनिष्ठा नक्षत्रास शनिवार निद्राविकारातून सतावेल.
मीन:
व्यावसायिक लाभ होतील केंद्र प्रतियोगांतून सप्ताहातील ग्रहांचं फिल्ड मोठं विचित्र राहील. उत्तरा भाद्रपदा व्यक्ती या ग्रहयोगांच्या विचित्र अमलाखाली येऊ शकतात. नोकरीतील अहंकार टाळा. संशयास्पद क्रिया-प्रतिक्रिया टाळा. बाकी रेवती नक्षत्र व्यक्ती गुरु-शुक्र शुभयोगातून ता. २२ व ता. २३ या दिवसांतून व्यावसायिक लाभ उठवतील. शनिवारी धडपडू नका.

Tajya Batmya