भविष्य

मेष:
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ:
अनपेक्षितपणे एखादी मोठा खर्च संभवतो. हितशत्रुंवर मात कराल.
मिथुन:
महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रवासात वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कर्क:
नवीन परिचय होतील. मनोबल उत्तम राहील.हितशत्रुंवर मात कराल.
सिंह:
तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या:
प्रवास शक्‍यतो टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
तूळ:
वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.
वृश्चिक:
वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे.
धनु:
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रतिष्ठा वाढेल.
मकर:
संततिसौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
कुंभ:
आरोग्य उत्तम राहील. काहींना व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल.
मीन:
जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
Sunday, November 29, 2020 to Saturday, December 5, 2020
मेष:
संसर्गजन्य बाधेपासून सावध मेष : अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी हा सप्ताह पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात दखलपात्र राहील. संसर्गजन्य बाधेपासून सावध. प्रवासात जपा. ता. तीन व चार या दिवशी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना महत्त्वाच्या कामांच्या गतिमानतेमुळे ताण पडेल. मात्र, नोकरीत शुभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी घरात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
वृषभ:
मित्रांशी गैरसमज नकोत वृषभ : छायाकल्प ग्रहणाची पौर्णिमा तरुणांना मानसिक पातळीवरून प्रतिकूल. मित्रांशी गैरसमज होऊ देऊ नका. ता.तीन व चार या दिवशी वैयक्तिक सुवार्ता कळतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी मिळेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा विचित्र गुप्तचिंतेची.
मिथुन:
न बोलता कामं होतील! मिथुन : भावनात्मक ऊर्मी घेऊन जगणारी तुमची रास या सप्ताहात जीवनातील एक छानसा सूर आळवेल. छंदात मग्न राहा, ध्येयप्रकाशात वाटचाल करत राहा. गुरुवारची संकष्ट चतुर्थी अद्भुत फळं देईल. मौनात राहा. न बोलता कामं होतील! आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी चमत्कार थक्क करतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींविषयी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात गैरसमज होतील. काळजी घ्या.
कर्क:
नोकरीत अनपेक्षित भाग्योदय कर्क : गुरूचं मंत्रालय या सप्ताहात प्रभावीरीत्या काम करेल! थोरा-मोठ्यांच्या ओळखींतून मोठे लाभ. आश्र्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासचा काळ अपवादात्मक परिस्थितीत लाभदायक. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारी वैवाहिक जीवनातली सुवार्ता कळेल. नोकरीत अनपेक्षित भाग्योदय. वास्तुयोग.
सिंह:
वृद्धांची काळजी घ्या सिंह : पौर्णिमेच्या आसपासचा काळ तुमच्या राशीला संमिश्र स्वरूपाचा राहील. घरातील वृद्धांची काळजी घ्या. बाकी, पूर्वा नक्षत्राचे तरुण नोकरीतील घटनांमुळे प्रसन्नता अनुभवतील. गुरुवार अतिशय शुभदायक. विशिष्ट व्यावसायिक करारमदारांमुळे भविष्यात खात्रीपूर्वक लाभ होईल. शनिवार प्रवासात बेरंगाचा.
कन्या:
सरकारी कामं मार्गी लागतील कन्या : पौर्णिमेच्या आसपासच्या काळात व्यावसायिकांना मोठे लाभ. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील विशिष्ट नव्या रचनेचा लाभ होऊन काहींना परदेशी जाण्याची संधी. या सप्ताहात आई-वडिलांशी भांडू नका. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती ता. तीन व चार या दिवशी बाजी मारतील. गुंतवणुकींतून लाभ. सरकारी कामं मार्गी लागतील.
तूळ:
उधार-उसनवारी करू नका तूळ : पौर्णिमा संमिश्र स्वरूपाची फळं देईल. व्यावसायिक जुगार टाळा. उधार-उसनवारी करू नका. बाकी, स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना प्रियजनांबाबत गुरुवारी सुवार्ता कळतील. आनंदोत्सव साजरा कराल. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार कलहजन्य. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची खरेदीत फसगत होण्याची शक्यता.
वृश्चिक:
व्यावसायिक संकट टळेल वृश्र्चिक : राशीतील छायाकल्प चंद्रग्रहण स्त्रीविरोधी! स्त्री-पुरुषसंबंधांबाबत सावधच राहा. बाकी, विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शुभ ग्रहांचे अंडरकरंट गुप्तपणे लाभ देतील! व्यावसायिक संकट टळेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती पुत्रोत्कर्षामुळे धन्यता अनुभवतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या आसपासच्या काळात राजकारण टाळावं.
धनु:
मोठी झेप घेणार आहात! धनू : उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना एका ऐतिहासिक ग्रहमानातून नेणारा सप्ताह. फक्त धीर धरा. मोठी झेप घेणार आहात! ता. दोन व तीन या दिवशी पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या भाग्योदयाचा प्रारंभ. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी या सप्ताहात घरात मानसिक संतुलन राखावं. शनिवारी काळजी घ्याच.
मकर:
शुभसंकेत मिळतील मकर : पौर्णिमेनं सुरू होणारा हा सप्ताह प्रगतीची सप्तपदीच घालणार आहे! श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींच्या व्यवसायात सप्ताहाच्या सुरुवातीला मोठी तेजी येईल. शुक्रवारी जीवनातील मोठे शुभ संकेत मिळतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत स्थिरावतील. शनिवारी भांडू नका!
कुंभ:
उगाचच व्याकुळ व्हाल! कुंभ : नेपच्यूनच्या विशिष्ट स्थितीतून होणाऱ्या आजच्या पौर्णिमेला काहीजण उगाचच व्याकुळ होतील! या सप्ताहात सद्विचारात राहा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना एखाद्या माणसाची अकारण दहशत राहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी गैरसमज होऊ देऊ नयेत. बाकी, शततारका नक्षत्राच्या व्यक्ती पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शुक्रभ्रमणाचा लाभ घेतील. वैयक्तिक पातळीवर काही सुवार्ता मिळतील.
मीन:
आचारसंहिता पाळाच! मीन : राशीच्या मंगळाच्या पार्श्वभूमीवरची पौर्णिमा आणि इतर ग्रहस्थिती आचारसंहिता पाळायलाच लावणारी! घरात क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त करताना सावध! बाकी, उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. दोन ते चार हे दिवस नोकरी-व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर छानच. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार विचित्र मनोव्यथेचा.

Tajya Batmya