भविष्य

मेष:
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ:
सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.
मिथुन:
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील.
कर्क:
तुमच्या कार्यक्षेत्रात सुुसंधी लाभेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.
सिंह:
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी.
कन्या:
प्रवास सुखकर होतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल.
तूळ:
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक:
अपेक्षित गाठीभेटी होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
धनु:
कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरीत महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.
मकर:
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश.
कुंभ:
व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.
मीन:
प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
Sunday, January 17, 2021 to Saturday, January 23, 2021
मेष:
तरुणांनो, मस्ती करू नका! राशीतील मंगळ-हर्षल हे ग्रहांचा पट ताब्यात घेतील. सप्ताहात क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त करताना सावधच! तरुणांनी मस्ती टाळावी. अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ व २२ हे दिवस नैसर्गिक साथ देणार नाहीत. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट गोड!
वृषभ:
मानसिक अपघात टाळा! रोहिणी नक्षत्राच्या नवपरिणितांना सप्ताह सासुरवासाचा! अहंकारजन्य मानसिक अपघात टाळा! बाकी, व्यावसायिकांना शुभ ग्रहांची साथ चांगलीच राहील. ता. १८ व १९ रोजी मोठा आर्थिक ओघ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात काळजी घ्यावी.
मिथुन:
नोकरीत भाग्योदय पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाची एक सुंदर पार्श्वभूमी राहील. ता. १८ ते २० या कालावधीत नोकरी-व्यवसायात भाग्यसूचक हालचाली! स्त्रीमुळे भाग्योदय. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार वेदनेचा. धडपडू नका.
कर्क:
सिंगल धावाच काढा! मंगळ-हर्षल योगाची फील्ड ॲरेंजमेंट राहील. सिंगल धावाच काढा. नका मारू षटकार. ता. १८ व १९ या दिवसांत पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणाची उत्तम साथ. विशिष्ट करारमदार होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सन्मान. आश्र्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी गुप्तचिंता.
सिंह:
नोकरीनिमित्त परदेशगमन या सप्ताहात कौटुंबिक-मानसिक पर्यावरण बिघडेल. घरातील तरुणांच्या विचित्र वागण्यातून त्रास. बाकी, पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाची किनार लाभेल. नोकरीत परदेशगमनाच्या संधी. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना वडीलधाऱ्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागेल.
कन्या:
गृहिणींनो, काळजी घ्या मंगळ-हर्षल योगाचं फील्ड गृहिणीवर्गाला तापदायक. घरातील लहान मुलं सतावतील. फोडणी टाकताना सावध! बाकी, हस्त नक्षत्राच्या व्यक्तींचं कौतुक होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती भाग्यपथावर मार्गस्थ होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान.
तूळ:
सुरक्षाव्यवस्था घट्ट ठेवा कायदेशीर कटकटींतून झळा पोहोचतील! काळजी घ्या. ता. २० ते २२ हे दिवस स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना नैसर्गिक पाठबळ न देणारे. आपली सुरक्षाव्यवस्था घट्ट ठेवा. घरातील लहान मुलांची काळजी घ्या. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारची संध्याकाळ मोठी रम्य. सुवार्ता कळतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी लागेल.
वृश्चिक:
असंगाशी संग नको या सप्ताहात असंगाशी संग नकोच. मित्रांच्या भानगडीत पडू नका. बाकी, शुक्रभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर वैवाहिक जीवनात सुगंधित झुळका येतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ व १९ हे दिवस अतिशय शुभ. ज्येष्ठा नक्षत्रच्या व्यक्तींना दिलासा.
धनु:
लाभदायक स्थिती राशीचं शुक्रभ्रमण सुगंधित झुळका देणारंच. ता. १८ व १९ हे दिवस तरुणांना छानच! कलाकारांचा भाग्योदय. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील विशिष्ट परिस्थिती लाभदायक. मूळ नक्षत्राच्या गर्भवतींना सप्ताहाचा शेवट संवेदनशील. शेअर ट्रेडिंग किंवा जुगार टाळा.
मकर:
मनाची काळजी घ्या! ग्रहांचं फील्ड मंगळ-हर्षल पूर्णपणे ताब्यात घेतील. घरातील मानसिक पर्यावरण बिघडू शकतं. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींनी रामरक्षा श्रवण करावी. गुरुभ्रमणातून उद्याचा सोमवार तरुणांना जबरदस्त क्‍लिक होणारा. शनिवारी नोकरीत सुवार्ता.
कुंभ:
कला-छंदांतून प्रसिद्धी या सप्ताहात आजूबाजूच्या मानसिक पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम करणारा. आजूबाजूला सतत गोंगाट राहील. या सप्ताहात व्हॉट्‌सॲपवर जरा कमीच वावरा. त्रास टाळा! बाकी, शुक्रभ्रमणामुळे पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती कला-छंद या माध्यमांतून प्रसिद्धीला येतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना वसुलीतून लाभ.
मीन:
घरात दुरुत्तरं टाळा मंगळ-हर्षलच्या फील्डवरही सुरक्षित राहणारी रास. मात्र, घरात दुरुत्तरं टाळा. बाकी, उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत अपवादात्मक संधी येतील. सरकारी मंत्रालयांतून लाभ. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मोठा भाग्यसूचक. परदेशी व्यापारातून लाभ.

Tajya Batmya