Annual Horoscope 2024 - 'तूळ रास' या राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल 2024 वर्ष? जाणून घ्या सविस्तर अपडेट

जीवनात समतोल कसा साधावा, हे शिकविणारी रास म्हणजे तूळ (Libra Horoscope) होय.
Annual Horoscope 2024, Tula Rashi
Annual Horoscope 2024, Tula Rashiesakal
Summary

तराजू हे या राशीचे चिन्ह असल्याने तराजूप्रमाणे यांच्या विचारांची दिशा सतत वर-खाली होत असते. त्यामुळे यांचे विचार कधीही स्थिर नसतात.

-आनंद एस. मत्तीकोप-कुलकर्णी बेळगाव.

Annual Horoscope 2024, Tula Rashi : जीवनात समतोल कसा साधावा, हे शिकविणारी रास म्हणजे तूळ (Libra Horoscope) होय. मोठमोठ्या बाजारपेठा, नागरी वस्ती, व्यापार-उदीम नसेल, तर माणसाचे जीवन कठीण होईल. जीवनसत्त्वापैकी पैसा हे एक महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. ते नसेल, तर जीवनात प्रगती करणे कठीण जाईल, हेच ही रास दर्शविते. या राशीच्या लोकांना यावर्षी गुरू आर्थिक बाबतीत अतिशय उत्तम ठरणार आहे.

धनस्थानावर दृष्टी असल्याने सतत कुठून ना कुठून पैसा मिळत राहील; पण आठवा गुरू हा काही वेळा मृत्यूसम पीडाही देतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या. घरातील वातावरण धार्मिक (Religious) ठेवा. कोणतेही आजार झाल्यास त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. तुमच्या घरात देवधर्माचे व्यवस्थित सुरू असेल, तर काही त्रास होणार नाही.

Annual Horoscope 2024, Tula Rashi
Annual Horoscope 2024 - सिंह रास : जीवनाला कलाटणी अन् भाग्योदयाची संधी; वर्षभरात कसं असेल आपलं 'राशिभविष्य'

जानेवारी : तुमच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे उत्कृष्ट ग्रहमान आहे. धाडसाने अनेक कामे स्वीकाराल. जुने वाहन खरेदीचा विचार कराल. प्रवास व नोकरी-व्यवसायात दगदग वाढेल. घरगुती सुखाच्या बाबतीत जरा किरकोळ त्रास जाणवतील. वास्तूसंदर्भात बोलणी अथवा वाटाघाटी करू नका.

फेब्रुवारी : जे काम कराल, त्यात हमखास यश मिळेल. आर्थिक लाभ उत्तम. या महिन्यात घरातील सर्व अडगळ आणि बाद झालेल्या वस्तू बाहेर काढा. त्यामुळे अडलेल्या कामात यश मिळेल. मानसिक सुख लाभेल. एखाद्या मित्र-मैत्रिणीविषयी विचित्र अनुभव येतील.

मार्च : मोठ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून महत्त्वाची कामे करून घ्यावीत. वेळीच घेतलेला योग्य निर्णय आणि काळानुसार ठरवलेले गणित यामुळे अनेक महत्त्वाची कंत्राटे मिळतील. परीक्षेच्या बाबतीत जरा सावध राहावे लागेल. नोकरी, लग्न व तत्सम्‌ शुभकार्यात भाग घेण्याचे योग आहेत. घरी थोरा-मोठ्यांची उठबस होईल. मुला-बाळांच्या दृष्टीने उत्तम योग आहेत.

एप्रिल : घर, वाहन खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. ओळखीमुळे महत्त्वाची कामे होतील. वाहने घेण्याची इच्छा पूर्ण होईल. काही बाबतीत तडजोड आणि शर्ती स्वीकाराव्या लागतील. कुटुंबातील वातावरण वैचारिक गोंधळाचे राहील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मन सांभाळावे लागेल. या महिन्यात जर कुणाला उधार, उसनवार देणार असाल, तर जपून राहावे लागेल. कागदोपत्री व्यवहार मात्र यशस्वी होतील. विवाहासाठी प्रयत्न करीत असाल, तर अनुकूल काळ आहे.

Annual Horoscope 2024, Tula Rashi
Annual Horoscope 2024 - कन्या रास : 'उजळेल भाग्य, पण जपा आरोग्य'; वर्षभरात कशी असेल आपली 'रास'

मे : हाती पडलेल्या कामात मोठे यश मिळेल. सरकारी कामे सहज होतील. नोकरी-व्यवसाय, लग्नासह अन्य शुभकार्यात भाग घेण्याचा योग आहे. घरी थोरा-मोठ्यांची उठबस होईल. मुला-बाळांच्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम योग आहेत. काही नातेवाईकांच्या विक्षिप्त वागण्यामुळे जरा मनःस्ताप होईल. वाहन जपून चालवावे.

जून : या महिन्यातील ग्रहमान बऱ्याच बाबतीत गोंधळ माजवणार आहे. दक्षिणायनाचे तीन दिवस सर्व बाबतीत सांभाळावे लागतील. आरोग्याची काळजी घ्यावी. महिन्याच्या उत्तरार्धात महत्त्वाची कामे अडतील. सासरच्या व्यक्तींकडून अचानक काही तरी कामासाठी बोलावणे येईल.

जुलै : या महिन्यातील ग्रहांचे परिभ्रमण किरकोळ अपघात आणि खर्च वाढवणारे आहे. कुणाशीही वाद-विवाद न घालता मन शांत ठेवून वागावे लागेल. किरकोळ चुकाही मोठे स्वरूप धारण करू शकतात. कॉम्प्युटर आणि मशीन यांच्याशी संबंध असलेल्यांनी बेफिकीरपणा टाळावा. जुन्या मशिनरीची दुरुस्ती करताना हातापायाची काळजी घ्यावी. कोणाही अनोळखी व्यक्तीला वाहन व पैसे उसने देऊ नयेत. ते नक्कीच अडकतील.

ऑगस्ट : वैवाहिक सौख्यात वाढ होईल. पती-पत्नीतील सर्व मतभेद दूर होऊन घरात सुखशांती राहील. हाती चार पैसे खेळू लागतील. कोणत्याही बेकायदेशीर बाबतीत गुंतू नये अथवा कुठेही गुंतवणूक करणार असाल, तर चारचौघांचा सल्ला अवश्य घ्या. किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका. थोरा-मोठ्यांचा सल्ला नाकारू नका. काही बाबतीत काटकसरीचे धोरण ठेवावे लागेल.

Annual Horoscope 2024, Tula Rashi
Sangli Sakal Anniversary : संतांच्या शब्दांचे सामर्थ्य कृतीत आणा; प्रख्यात वक्ते गणेश शिंदेंची भावनिक साद

सप्टेंबर : काही न होणाऱ्या गोष्टी या महिन्यात घडतील. अचानक धनलाभ आणि अचानक खर्च असे त्याचे स्वरूप असेल. एखाद्या थोर व्यक्तीच्या संपर्काने अथवा सोबत असल्याने तुमच्या जीवनाला कलाटणी मिळेल. दैवी कृपेचे योग दिसतात. कुटुंबातील वडिलोपार्जित इस्टेटीबाबतचे प्रश्‍न निकालात निघतील. या महिन्यात जे काम हाती घ्याल, ते नक्कीच पूर्ण करून दाखवाल; पण थोडे धाडस आणि संयम ठेवावा लागेल.

ऑक्टोबर : संततीची इच्छा असेल, तर ती पूर्ण होईल. नोकरीविषयक उच्चपद प्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल योग दिसतात. लिखाणात जरा सावध राहावे. आपले गुप्त शत्रू त्याचा गैरफायदा घेऊन तुम्हाला बदनाम करू शकतात. स्वतःचे घर असावे, अशी इच्छा असेल, तर प्रयत्न करा. कुठून तरी नक्कीच मार्ग दिसेल.

नोव्हेंबर : अग्नी शांत असेल, तर जीवनाचे सोने करून दाखवाल; पण बिघडल्यास सर्व काही स्वाहा करून टाकेल, अशा अर्थाची एक म्हण आहे. या महिन्यात अत्यंत महत्त्वाची कामे त्वरित होतील; पण संयम आणि शांतपणे राहावे लागेल. शारीरिक प्रकृती साथ देईल. राशीतील बदलते क्रमांक काही बाबतीत तुमच्या धोरणांना नवा आकार देतील.

डिसेंबर : इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर, मोबाईल आदींशी संबंध असेल, तर हा महिना तुम्हाला मोठे यश मिळवून देईल. कारखानदारी असेल, तर नव्या ऑर्डर मिळतील. आर्थिक सुधारणाच्या दृष्टीने उत्तम योग आहेत. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल. एखादी वस्तू हरवली असेल, तर ती परत मिळू शकते.

Annual Horoscope 2024, Tula Rashi
'यल्लमा देवी यात्रेतील प्राणी हत्या रोखा'; नवस फेडण्याच्या बहाण्याने हजारो कोंबडी, बकरी, मेंढ्यांचा दिला जातोय बळी

'तराजूप्रमाणे विचारांची दिशा सतत वर-खाली होते'

चित्रा नक्षत्राचा दुहेरी लाभ, विशाखा नक्षत्राचे धाडस आणि कपट तसेच खोलवर विचार करण्याची कृती, तर स्वाती नक्षत्राचा समतोलपणा, व्यवहारीपणा, प्रेमळ वृत्ती तूळ या राशीत दिसून येते. अनेक बाबतीत यश देणारी ही रास आहे. तराजू हे या राशीचे चिन्ह असल्याने तराजूप्रमाणे यांच्या विचारांची दिशा सतत वर-खाली होत असते. त्यामुळे यांचे विचार कधीही स्थिर नसतात. स्वतः कोणावरही अन्याय करणार नाहीत आणि कोणी करीत असेल, तर ते खपवून घेणार नाहीत, हा या राशीच्या लोकांचा गुण असतो.

या वर्षी शनीचे भ्रमण वैवाहिक जीवनात जरा गोंधळाचे वातावरण निर्माण करेल. किरकोळ कारणावरून गैरसमज निर्माण होऊ शकतात. मुलांच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. राहू-केतूचे भ्रमण सर्व कार्यांत मोठे यश देईल. ज्या क्षेत्रात असाल, तिथे काहीतरी मोठे कार्य करून दाखवाल; पण शत्रूपीडाही निर्माण होईल. त्यासाठी तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे. या वर्षातील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे हर्षलचे अष्टम स्थानात आगमन. आगामी सात वर्षे सर्व बाबतीत जागृत राहावे लागेल. अचानक आणि चमत्कारी घटना घडविणे, हा या ग्रहाचा गुणधर्म आहे. गणेश आराधना केल्यास या ग्रहाचे कोणतेही अनिष्ट परिणाम जाणवत नाहीत. विवाहाच्या दृष्टीने हे वर्ष अनुकूल नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com