

Know the true nature of Mulank 4, 5 and 8 from birth date
Sakal
आपल्या आजूबाजूला अनेकदा अशी माणसे भेटतात, जी समोर अत्यंत गोड आणि नम्रपणे बोलतात; मात्र त्यांच्या मनात नेमके काय विचार सुरू आहेत आणि ते पुढे काय पाऊल उचलणार आहेत, याचा साधा अंदाजही कोणाला येत नाही. अंकशास्त्रानुसार (Numerology), माणसाच्या जन्मतारखेवरून त्याच्या मूळ स्वभावाची, बुद्धिमत्तेची आणि गुप्त रणनीतीची अनेक गुपिते उलगडतात. काही मूलांकांच्या व्यक्तींमध्ये इतरांपेक्षा जास्त चलाखी, मुत्सद्देगिरी आणि स्वतःचे प्लॅन्स गुप्त ठेवण्याची जबरदस्त कला उपजतच असते.