Rashi Bhavishya | आजचे राशिभविष्य | Daily Horoscope - 6th January 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashi Bhavishya 6th January 20223

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 6 जानेवारी 2023

मेष : गुरुकृपा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्न निर्माण होतील.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. वैचारिक परिवर्तन होईल.

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

तूळ : प्रवास सुखकर होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मकर : वेळ वाया जाण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

कुंभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.