

Sagittarius weekly horoscope (5 to 11 April 2026)
esakal
धनु राशीच्या व्यक्तींसाठी ५ ते ११ एप्रिल हा आठवडा करिअरच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमचे बुद्धिकौशल्य आणि निर्णयक्षमता तुम्हाला यशाच्या दिशेने नेतील. धनु राशीच्या तरुणांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि प्रगतीचा मार्ग उघडणारा आहे.
मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत छान परिस्थितीजन्य लाभ मिळतील. वरिष्ठांकडून पाठबळ मिळेल आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. काहींना नोकरीच्या माध्यमातून परदेशात जाण्याची संधी मिळू शकते, जी करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची ठरेल.