

Visphotak Yoga 2026:
Sakal
February Zodiac Prediction: वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळाला शक्ती आणि शौर्याचे प्रतीक मानलं जातं. हा ग्रह धैर्य, ऊर्जा, आत्मविश्वास, उत्साह आणि उग्र स्वभावाशी संबंधित आहे. जेव्हा मंगळ आपली राशी किंवा गती बदलतो तेव्हा त्याचा परिणाम केवळ वैयक्तिक जीवनापुरता मर्यादित नसून सामाजिक आणि जागतिक घटनांवर देखील दिसून येतो.
पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2026 मध्ये, मंगळ कुंभ राशीत संक्रमण करेल, जिथे छाया ग्रह राहू आधीच उपस्थित असेल. मंगळ आणि राहू यांच्या या संयोगामुळे एक अतिशय तीव्र आणि अशांत योग निर्माण होईल. ज्याला ज्योतिषशास्त्रात 'विस्पोटक योग' म्हणतात. हा योग काही राशींसाठी तणाव आणि समस्या निर्माण करु शकते.