

weekly horoscope 1st february 2026 to 6th february 2026
नोकरीविषयक प्रश्न सुटतील
मेष : पौर्णिमेच्या प्रभावात सुरू होणारा सप्ताह पुढे उत्तम वाटचाल करणारा ठरणार आहेच. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी आजचा सूर्योदय पाहून सप्ताहाचे उत्तम नियोजन करावेच. भाग्यबीजेच पेरली जातील. सप्ताहाचा शेवट मोठ्या विजयोत्सवानेच होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताह मोठे बॅटिंग फिल्डच राहील. ता. ४ ची संध्याकाळ मोठी भावरम्य राहील. वैयक्तिक सुवार्ता फ्लॅश न्यूजमध्ये येतील. पती वा पत्नीचा मोठा भाग्योदय चकित करेल. नोकरीत योग्य ठिकाणी बदलीतून लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचे पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र आणि गुरुप्रतिपदा जीवनातील आशावाद बळकट करेल. घरातील प्रिय व्यक्तींच्या गुप्तचिंता जातील. घरातील तरुणांचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील.