Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal

साप्ताहिक राशिभविष्य : ४ डिसेंबर २०२२ ते १० डिसेंबर २०२२

मानवसंसाधन हा शब्दप्रयोग सध्या प्रचलित आहेच. अर्थातच ह्युमन रिसोर्सेस हा विषय जॉब मार्केटमध्ये चर्चिला जातच असतो.

नोकरीविषयक संधी येतील

मेष : सप्ताहात होणारी रवी-मंगळ प्रतियुती पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठी दखलपात्र राहील. प्रवास सांभाळा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ घरातील वृद्धांची चिंता राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात स्त्री-पुरुष संबंधातून वादग्रस्त. बाकी अश्‍विनी नक्षत्राच्या तरुणांना उत्तम नोकरीविषयक संधी येतील. उत्तम विवाह प्रस्ताव.

व्यवसायात वसुली होईल

वृषभ : राशीत होणारी पौर्णिमा ग्रहयोगातून उच्चदाबाचीच. वाहनं सांभाळा. घरगुती वादात तोल सांभाळा. बाकी कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट व्यावसायिक उत्तम प्राप्तीचा. व्यावसायिक उत्तम वसुली. विशिष्ट पुत्रचिंता जाईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा सहकुटुंब मौजमजेची, मात्र पाकीट जपा. भाजणं जपा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना कला वा छंद उपक्रमांतून मोठा प्रतिसाद. मात्र नोकरीत वरिष्ठांशी जपून.

विवाहाचे उत्तम प्रस्ताव येतील

मिथुन : पौर्णिमेचं प्रभाव क्षेत्र संमिश्र स्वरूपाची फळं देईल. शारीरिक वेदनायुक्त व्याधीतून त्रास होईल. बाकी सप्ताहात शुभग्रहांची लॉबी कार्यरत राहील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात नोकरीत चमत्कार घडवेल. परिस्थितिजन्य लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम विवाह प्रस्ताव येतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ विचित्र खर्चाचे प्रसंग. गैरसमजातून भांडणं.

परदेशी भाग्योदय

कर्क : सप्ताहाचा आरंभ शुभग्रहांच्या साथसंगतीचाच. ओळखी, मध्यस्थीतून लाभ. पौर्णिमा वास्तूविषयक व्यवहारांची. सप्ताहातील शुभग्रह नवकल्पनांना उजाळा देतील. तरुणांनी सप्ताहारंभी अवश्‍य लाभ घ्यावा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींवर गुरुकृपेचा वर्षाव. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींचा परदेशी भाग्योदय. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींपैकी नवपरिणीतांचे भाग्योदय.

झंझावाती यश लाभेल

सिंह : पौर्णिमेजवळचा वक्री मंगळाचा प्रभाव तरुणांना विशिष्ट स्पर्धात्मक यशाचा. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादं झंझावाती यश. मात्र नोकरदारांनी नोकरीतील राजकारण टाळावं. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखती शुभलक्षणं दाखवतील. उत्तरा नक्षत्राच्या वृद्धांनी मुलाबाळांशी गैरसमज टाळावेत.

जोरदार मुसंडी माराल

कन्या : सप्ताहातील पौर्णिमेजवळचं ग्रहमान मोठं सुंदर राहील. फक्त नाकासमोर चला. कुसंगत टाळा. व्यसनं किंवा कुपथ्यं नकोत. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती जोरदार मुसंडी मारतील. वैयक्तिक उत्सव, समारंभ होतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींकडून उंची खरेदी. मात्र पौर्णिमेजवळ गर्दीची ठिकाणं जपा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पगारवाढ, बेरोजगारांना नोकरी.

तरुणांच्या समस्या सुटतील

तूळ : पौर्णिमेचा उच्चदाब राहील. आजूबाजूचं अवधान ठेवा. बाकी पौर्णिमेच्या प्रभावात शुभग्रहांची लॉबी क्रियाशील राहीलच. घरातील तरुणांचे प्रश्‍न सुटतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ गाठीभेटींतून साध्य करून देणारा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ विचित्र खर्च. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा उत्सव, समारंभातून बेरंगाची.

अकल्पित लाभ व रुबाब वाढेल

वृश्‍चिक : पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात शुभग्रह उत्तम खेळी करतील. तरुणांनी शिक्षण, नोकरी आणि विवाह आदी संदर्भातील संधीवर दबा धरून राहावं. ता. ८ व ९ हे दिवस अतिशय सुसंवादी. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना अकल्पित लाभ. सप्ताहात ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचा खरोखरच रुबाब वाढेल. मात्र राजकारणी मंडळींनी जपावं.

नोकरीत मानांकन वाढेल

धनू : पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र अपवादात्मक अशा गोष्टी घडवणारं; सतत जागृत राहा. भाजणं, कापणं सांभाळा. बाकी राशीतील बुध, शुक्र मूळ नक्षत्रास पौर्णिमेजवळ वैयक्तिक उत्कर्षाचेच. नोकरीतील मानांकन वाढेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळचा वक्री मंगळाचा उच्चदाब बेरंगाचा. मौल्यवान वस्तू जपा.

गुंतवणुकीतून लाभ

मकर : साडेसातीतला वक्री मंगळ घटनाद्रोह करण्यासाठी उद्युक्त करत असतो. त्यामुळेच सप्ताहातील वक्री मंगळाच्या आधिपत्याखालील पौर्णिमा नियमभंगातून अंगाशी येऊ शकते. बाकी सप्ताहातील बुध, शुक्राशी होणारे शुभयोग उत्तराषाढा नक्षत्रास दैवी कनेक्‍टिव्हिटीतून बोलतीलच. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट ओळखीतून लाभ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभी गुंतवणुकीतून लाभ.

शुभग्रहांची साथ मिळेल

कुंभ : सप्ताहात पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात शुभग्रहांची लॉबी वर्चस्व ठेवून राहीलच. मात्र सार्वजनिक जीवन सांभाळा. नवपरिणीतांनी वातावरण ओळखून वागावं. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात सणसमारंभातून वागण्या-बोलण्यातून बेरंग टाळावा. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी, व्यावसायिक पार्श्‍वभूमीवर परिस्थितिजन्य लाभ मिळू शकतो. मात्र, घरात क्रोधाला आवरा.

प्रिय व्यक्‍तींचा उत्कर्ष

मीन : सप्ताहातील दत्तजयंती विशिष्ट अलौकिक अनुभव देईल. घरातील प्रिय व्यक्तींचे उत्कर्ष होतील. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतून परदेशगमन. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वैयक्तिक सुवार्तांतून धन्य करणारा. रेवती नक्षत्रास पौर्णिमेचं प्रभाव क्षेत्र उत्सव, समारंभातून जपण्याचं. मौल्यवान वस्तू जपा.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com