weekly horoscope 07 July 2024 to 13 July 2024
weekly horoscope 07 July 2024 to 13 July 2024esakal

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०७ जुलै २०२४ ते १३ जुलै २०२४)

07 July 2024 to 13 July 2024 : अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार सहकुटुंब मौजमजेचा. पर्यटनातून आनंद मिळेल.

छंदांमधून मोठा वाव मिळेल

मेष : सप्ताह भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांच्या माध्यमातून लाभदायकच ठरेल. घरातील कार्ये ठरतील. वास्तुयोग आहेच. तरुणांना छंद वा उपक्रमांतून मोठा वावच मिळेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मोठा शुभलक्षणी. विशिष्ट प्रकाराचे कायदेशीर प्रश्न सोडवाल. वादग्रस्त येणं वसूल कराल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार सहकुटुंब मौजमजेचा. पर्यटनातून आनंद मिळेल.

व्यवसायात स्थिरता लाभेल

वृषभ : राशीतील बलवान स्थिर ताऱ्याजवळील गुरु ग्रहांचा पट ताब्यात घेईल. सप्ताहाची सुरुवात मोठ्या विजयोत्सवातून साजरी होईल. घरातील प्रिय व्यक्तींचे मोठे भाग्योदय होतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट बहुमान मिळेल. नवपरिणितांचे मोठे भाग्योदय होतील. अपत्य लाभाची चाहूल लागेल. काहींना पुत्रोत्कर्षातून धन्यता लाभेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट करारमदारांतून व्यावसायिक निश्चिंतपणा लाभेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार लॉटरी लागण्याचा योग आणेल. घरात कार्ये ठरतील.

वास्तुविषयक प्रश्‍न सुटतील

मिथुन : सप्ताहात शुक्रकलांचा एक उन्मेष पाहायला मिळेल. नव्या ओळखी होतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी संधी मिळतील. तरुणांना नोकरीत मानांकनातून लाभ होईल. वरिष्ठांची मर्जी लाभदायक ठरेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार वास्तुविषयक प्रश्नांतून सोडवेल. काहींना वास्तुविषयक कर्ज मिळेल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना विशेषतः स्वतंत्र व्यावसायिकांना ता. ११ आणि १२ हे दिवस महत्त्वाच्या गाठीभेटी घडवतील. तरुणांच्या विवाहविषयक हालचाली होतील.

गुप्त चिंता जातील

कर्क : सप्ताहात राशीतील शुक्रकलांचा मोठा उत्कर्ष राहील. माणसांचं सहकार्य सतत राहील. घरातील मानसिक पर्यावरण उत्तम राहील. भावाबहिणींचे प्रश्न सुटतील. उद्याचा सोमवार पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींच्या विशिष्ट गुप्तचिंता घालवेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. ११ व १२ हे दिवस विशिष्ट विक्रम नोंदवणारे ठरतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार निश्चितच गुरुकृपेचा राहील. शनिवार संतसमागम घडवेल.

महत्त्वाच्या कामात यश मिळेल

सिंह : सप्ताहातील गुरुचं बलवत्तर अशा स्थिर ताऱ्याजवळील भ्रमण पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना कनेक्टिव्हिटी देईल. ता. ११ व १२ हे दिवस मोठे गतिमान राहतील. महत्त्वाच्या कामांतून मोठं यश मिळेल. सरकारी माध्यमातून लाभ होईल. व्यावसायिक जाहिराती प्रतिसाद देतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात उत्तम प्रवासयोग येतील. मित्रमंडळींबरोबर मोठी मौजमजा कराल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात उधार-उसनवारीपासून काळजी घ्यावी.

नोकरी-व्यवसायात सुंदर पर्व येईल

कन्या : सप्ताहातील एक नशीबवान रास राहणार आहे. बलवत्तर अशा शुक्रकलांचा आस्वाद गुरुकृपेतून घ्याल. सप्ताहात जीवन भावभक्तिमय होऊन वाटचाल करू लागेल. उद्याचा सोमवार याची प्रचिती देईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी सिद्धी प्राप्त होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी व्यावसायिक क्षेत्रात एक सुंदर पर्व सुरू होईल. सप्ताहाचा शेवट एखादं बोचणारं शत्रुत्व संपेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मंत्रालयातून विशिष्ट लाभ होतील आणि त्यांचा दरारा वाढेल.

नोकरीत बदलीतून लाभ शक्य

तूळ : सप्ताहात मोठ्या यशातून फ्लॅशन्यूज देणारी रास राहील. काहींना नोकरीत मानांकनातून लाभ. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना जाहिरात माध्यमातून लाभ होतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ११ व १२ हे दिवस शुक्रकलांच्या उत्कर्षातून अत्यंत लाभदायी ठरतील. उद्याचा सोमवार विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बदलीतून लाभ देणारा. राजकारणात यशस्वी व्हाल. शनिवारी पुत्रचिंता जाईल.

मनासारख्या घटना घडतील

वृश्चिक : गुरुचं सप्तमस्थ स्थिर ताऱ्याजवळील भ्रमण आपल्या राशीस निखालस अशी शुभ फळं देईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार शुभ ग्रहांचं एक पॅकेजच घोषित करेल. तरुणांचा आत्मविश्वास वाढवणारा असा हा सप्ताह. ता. ११ चा गुरुवार विजयी चौकार- षटकारांचा असेल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक ओघ गवसेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ चा मंगळवार क्रिया-प्रतिक्रिया जपण्याचा. शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीपासून सांभाळा.

स्पर्धात्मक यश मिळेल

धनु : सप्ताहात खरेदी-विक्रीतील संमोहने टाळा. अपरिचित व्यक्तींपासून काळजी घ्या. तरुणांनी प्रेमाच्या जाळ्यात अडकू नये. बाकी सप्ताह मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक तेजी ठेवेल. पती व पत्नीचा आर्थिक उत्कर्ष होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात विशिष्ट सरकारी कामातून यश येईल. ता. ११ चा गुरुवार एखादी ग्रासलेली चिंता घालवेल. थोरामोठ्यांमुळं नोकरीचा लाभ होईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादं स्पर्धात्मक यश मिळेल.

ऊर्जासंपन्न असा सप्ताह

मकर : सप्ताह शुभग्रहांच्या जबरदस्त कनेक्टिव्हिटीचा. तरुणांनी अवश्‍य लाभ घ्यावा. सप्ताहाची सुरुवात विवाहयोगाची. काहींना नोकरीविषयक मुलाखतींतून ग्रीन सिग्नल मिळेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह अतिशय ऊर्जासंपन्न होईल. नव्या ओळखी होतील. सप्ताहाचा शेवट श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट ग्रासलेली गुप्तचिंता घालवेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात जुगारासारख्या बाबी टाळाव्यात मात्र सप्ताहात वादग्रस्त येणे येईल.

शैक्षणिक चिंता दूर होतील

कुंभ : सप्ताह क्रिया-प्रतिक्रियांमधून जपण्याचा. वैवाहिक जीवनात एकमेकांची भावस्पंदनं जपा. बाकी सप्ताह शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट शैक्षणिक चिंता घालवणारा. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात व्यावसायिक वसुलीतून चांगलाच दिलासा मिळेल. दि. ११ चा गुरुवार गुरुकृपेचाच. नोकरीतलं एखादं वादळ शमेल. मातृपितृ चिंता जाईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विचित्र चोरी किंवा नुकसानीचे प्रसंग अडचणीत टाकू शकतात, सावधगिरी बाळगा.

‘मॅन ऑफ द मॅच’ ठराल

मीन : शुभग्रहांचं एक झकास फिल्ड राहील. शुक्रकलांचा तरुणांना मोठा लाभ होईल. कलाकारांचा मोठा भाग्योदय होईल. नोकरीत वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल आणि भाग्योदय होईल. काहींचे प्रेमविवाह संपन्न होतील. एकूणच उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती मॅन ऑफ द मॅच होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यातलं एखादं संकट शनिवारी निघून जाईल. हरवलेले गवसेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com