weekly horoscope 14th april 2024 to 20th april 2024
weekly horoscope 14th april 2024 to 20th april 2024 Sakal

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (१४ एप्रिल २०२४ ते २० एप्रिल २०२४)

माणसाच्या भावजीवनाचं एक पर्यावरण असतं आणि हे पर्यावरण एका श्रद्धेच्या पार्श्वभूमीवर जोपासलं जातं. श्रीराम नवमी ही या नैसर्गिक पर्यावरणाचा आत्मा असल्यासारखीच आहे.

तरुणांना नोकरी मिळेल

मेष : सप्ताह निश्चितच भाग्यलक्षणं दाखवेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. श्रीराम नवमी अतिशय भावरम्य राहील. तरुणाची विवाहाबाबतीतील चिंता जाईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात सप्ताहारंभ विलक्षण भेटीगाठी घडवेल. तरुणांना ओळखी मध्यस्थीतून नोकरीचा लाभ होईल. शनिवार देवदर्शनाचा ठरेल.

मित्रमंडळींकडून लाभ होईल

वृषभ : सप्ताहावर बुध-शुक्र युतियोगाचा अर्थातच सहयोगाचा पूर्णपणाने अंमल राहील. मृग नक्षत्राच्या व्यक्ती संपूर्णपणानं फॉर्ममध्ये येतील. सतत मनासारख्या घटना घडतील. नोकरीविषयक मुलाखती यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून लाभ. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींची उत्तम खरेदी होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना कला व छंद माध्यमातून प्रसिद्धी योग. श्रीराम नवमी उत्सव - समारंभातून झगमगाटाची ठरेल.

खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील

मिथुन : शुभग्रहांच्या साथसंगतीतून विजयी चौकार-षटकार मारणार आहात. ता. १४ ते १७ हे दिवस मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार करतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात वास्तुयोग. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १९ चा शुक्रवार विवाहविषयक हालचाली करणारा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात सहली, करमणुकीच्या कार्यक्रमात सांभाळावं. अन्नपाण्यातील संसर्गापासून जपावं.

व्यवसायात धनवर्षाव होईल

कर्क : बुध-शुक्र युतीयोगाच्या पार्श्वभूमीवर आश्‍लेषा नक्षत्राच्या तरुणांना भाग्योदयाच्या अनेक संधी येतील. नोकरीतील मानांकन अर्थातच रेटिंग वाढेल. ता. १६ व १७ हे दिवस एकूणच विजयोत्सवाचे ठरतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना तीर्थाटनाचा योग आहे. एखादा नवस फेडाल. पुष्प नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ व १९ हे दिवस व्यावसायिक धनवर्षावाचे ठरतील.

राजकीय व्यक्तींचे सहकार्य मिळेल

सिंह : सप्ताहात पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना बुध-शुक्र सहयोगाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकदृष्ट्या अकल्पित लाभ होतील. व्यावसायिक उत्सव प्रदर्शनांना उत्तम प्रतिसाद लाभेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींची वसुली होईल. राजकीय व्यक्तींकडून उत्तम सहकार्य लाभेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारचा प्रवास दगदगीचा किंवा बेरंगाचा. महत्त्वाचे दस्तऐवज किंवा कागदपत्रे सांभाळा. भाजणं, कापणं यांपासून जपा.

मुसंडी मारणारं ग्रहमान

कन्या : बुध-शुक्र युतियोगाच्या पार्श्वभूमीवर जोरदार मुसंडी मारणार आहात. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती सुखद अशा महत्त्वाच्या वार्ता देतील. नोकरीत मोठे परिस्थितीजन्य लाभ मिळतील. ता. १५ ते १७ हे दिवस आपल्या राशीस एकूणच छान प्रवाही राहतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींकडून उत्तम खरेदी होईल. विशिष्ट स्वरूपाची वादग्रस्त वसुली होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात धारदार उपकरणं सांभाळावीत. सप्ताहात कामगार पीडा होईल.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल

तूळ : सप्ताह संमिश्र स्वरूपाची फळं देणारा. सप्ताहात संमोहन टाळा. मित्र व योग्य संगत ठेवा. कोणत्याही आमिषांना बळी पडू नका. बाकी स्वतंत्र व्यावसायिकांना ता. १५ ते १७ हे दिवस अतिशय प्रवाही राहतील. मोठ्या लोकांच्या भेटीगाठी . विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्सव प्रदर्शनांतून लाभ. जुन्या गुंतवणुकींतून लाभ मिळेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींच्या नोकरीतील ताणतणाव जाईल. मात्र शनिवारी सकाळी भांडणं टाळा.

आदर सत्कार होईल

वृश्‍चिक : सप्ताहातील अशुभ अशा स्पंदनांना बुध-शुक्र युतीयोगातून आवर घातला जाईल. त्याचा ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम लाभ उठवता येईल. ता. १५ ते १७ हे दिवस आपल्या राशीस एकूणच सुसंगत राहतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी आर्थिक प्राप्ती होईल. मुलाबाळांचे भाग्योदय सद्‌गदित करतील. शनिवारी, सूर्योदयी वाहनं सांभाळा, बाकी संध्याकाळ भावरम्य राहील.

मोठ्या मनोकामना पूर्ण होतील

धनु : सप्ताहातील बुध-शुक्र युती योगाचे पॅकेज तरुण-तरुणींना उत्तम. विवाहासाठी आपल्या मनाचे अँटिने रोखूनच ठेवा. पूर्वा नक्षत्रास सप्ताहाचा आरंभ आणि शेवट झगमगता राहील. ता. १९ ची कामदा एकादशी मोठी मनोकामना पूर्ण करणारी. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात मोठे धनलाभ होतील. सरकारी अनुदानातून लाभ होईल. काहींना राजकीय लाभ शक्य.

प्रवासात काळजी घ्यावी

मकर : सप्ताह जीवनातील आशावाद वाढवणाराच ठरेल. ता. १५ ते १७ हे दिवस उमलत्या तरुणाईला छानच. नोकरीतील काळात विविध घटनांतून वातावरण प्रसन्न राहील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना देवदेवतांचा अनुग्रह प्राप्त होईल. श्रीराम नवमी, श्रद्धावंत बनवणारी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी सूर्योदयी भांडणं टाळावीत. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासात जपावं.

व्यवसायातल्या अडचणी संपतील

कुंभ : सप्ताहात शुभग्रहांची गुप्तपणानं साथसंगत राहील. घरातील मानसिक पर्यावरण छानच राहील. उद्याचा सोमवार वैयक्तिक सुवार्तांचाच. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक ओढाताण या सप्ताहात संपेल. रेंगाळलेली वसुली होईल. भावाबहिणीचे विशिष्ट प्रश्‍न सुटतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींची शुक्रवारची कामदा एकादशी मोठ्या दैवी प्रचितीची, मोठ्या भेटवस्तूतून लाभ.

नोकरीतील औदासीन्य जाईल

मीन : श्रीराम नवमीचा उत्सव देवदेवतांच्या अनुग्रहातून प्रचिती देणाराच. घरातील तरुणवर्गाचे प्रश्‍न सुटतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींवर पुष्पवृष्टीच होईल. ता. १५ ते १७ हे दिवस निश्‍चितच पूर्वसुकृतांतून लाभ देतील. नोकरी, व्यावसायिक औदासीन्य जाईल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं भावजीवन भावभक्तीनं ओसंडून वाहील. पती वा पत्नीचा मोठा भाग्योदय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com