Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०२ जून २०२४ ते ०८ जून २०२४)

सप्ताहात शुभग्रहांचा उत्तम प्रभाव राहील. ता. ३ ते ५ हे दिवस मोठे धमाल उडवतील. रवी-शुक्र सहयोग भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून शुभलक्षणी.
Read weekly Rashi bhavishya in marathi langauge weekly horoscope 2 June 2024 to 8 June 2024
Read weekly Rashi bhavishya in marathi langauge weekly horoscope 2 June 2024 to 8 June 2024Sakal

नवपरिणितांना संस्मरणीय कालखंड

मेष : सप्ताहात शुभग्रहांचा उत्तम प्रभाव राहील. ता. ३ ते ५ हे दिवस मोठे धमाल उडवतील. रवी-शुक्र सहयोग भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून शुभलक्षणी. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना वरील दिवस मोठ्या धनवर्षावाचे. नवपरिणितांना हे दिवस जीवनात संस्मरणीय राहतील. पती वा पत्नीचा मोठा भाग्योदय. अमावस्या चक्क मानसन्मानाची.

नोकरीत बढतीची चाहूल

वृषभ : राशीतील शुभग्रहयोग अमावस्येच्या सप्ताहातही मोठे शुभलक्षणी राहतील. कृत्तिका नक्षत्रास वैशाख वणव्यातही सुगंधित झुळका प्रसन्न ठेवतील. एकूणच ता. ५ ते ७ हे दिवस होतकरू तरुणांचे भाग्योदय करतीलच. जीवनात मोठे चमत्कार घडतील. अमावस्या रोहिणी नक्षत्रास नवसपूर्तीचा सोहळा करवेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बढतीची चाहूल लागेल

परदेशगमनाचा योग येईल

मिथुन : सप्ताहाची सुरुवात शुभग्रहांची रसद पुरवेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील एखादी ग्रासलेली चिंता जाईल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शैक्षणिक माध्यमातून परदेशगमन घडेल. पती वा पत्नीचं भाग्य उलगडेल. प्रेमिकांचं स्वप्न पूर्ण होईल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या दैवी प्रचितीतून श्रद्धा बळकट करेल. पुत्रोत्कर्ष होईल. देवदर्शन कराल.

स्पर्धापरीक्षांमध्ये मोठे यश लाभेल

कर्क : सप्ताहात सुवार्तांतून सतत चर्चेत राहणारी आपली रास राहील. ता. ३ ते ५ हे दिवस स्पर्धापरीक्षांतून मोठे यश देतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरीच्या संधी येतील. काहींना राजकीय प्रतिष्ठा लाभेल. वास्तुविषयक खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमन. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या घबाडयोगाची म्हणजे अर्थातच अकल्पित भाग्योदयाची.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल

सिंह : राशींच्या एक्स्चेंजमध्ये आपल्या शेअरचा भाव चांगलाच वाढणार आहे. मघा नक्षत्राच्या व्यक्ती मोठे विक्रम नोंदवतील. ता. ३ ते ५ हे दिवस शुभग्रहाच्या पॅकेजचेच. होतकरू तरुणांचे मोठे भाग्योदय. पूर्वा नक्षत्रास अमावस्या दैवी - प्रचितीची ठरेल. मोठे स्पर्धात्मक यश मिळेल. काहींच्या वर जुन्या गुंतवणुकीतून धनवर्षावाचा लाभ होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरी लागेल.

खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील

कन्या : शुभग्रहांच्या योगांतून मोठे परिस्थितीजन्य लाभ होतील. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाची संधी. ता. ४ ते ६ हे दिवस चढत्या क्रमानं शुभ ठरतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचे प्रभावक्षेत्र धनवर्षावाचं ठरेल, खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील. प्रेमिकांना दिलासा मिळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा त्यातल्या त्यात कलावंतांचा भाग्योदय होईल.

प्रवासामध्ये वाद टाळावा

तुळ : मंगळ आणि हर्षल यांची राश्यांतरे आपल्याला अमावस्येच्या प्रभावात विशिष्ट आचारसंहिता पाळायला लावतीलच. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी घरातील भावविश्व जपावेच. बाकी सप्ताहाची सुरुवात व्यावसायिक आर्थिक कोंडी घालवेल. स्वाती नक्षत्र व्यक्ती अमावस्येच्या सप्ताहातही शुभग्रहाची उत्तम कनेक्टिव्हिटी ठेवतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येजवळ प्रवासात वाद-विवाद करू नयेत.

ओळखीतून मोठी कामं होतील

वृश्चिक : शुभग्रहांचे योग वैवाहिक जीवनातून उत्तम बोलतील. विवाहेच्छुकांनी प्रेमाचे ॲन्टिने रोखून ठेवावेत. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना नक्षत्र लोकांतून लाभ. गॉडफादर भेटतील. ता. ५ व ६ हे दिवस मोठ्या यशाची परंपरा राखतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवनातून सुंदर पर्व सुरू होईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी अमावस्या धन-उद्योगाची तसेच ओळखी-मध्यस्थींतून मोठी कामं करून देणारी ठरेल.

बदलीमधून लाभ होईल

धनू : ग्रहमान संमिश्रच राहील. अमावस्येचं प्रभावक्षेत्र स्त्रीवर्गास उपद्रव देणारं ठरू शकतं. सप्ताह नोकरदारांना शुभ घटनांनी भरलेला. काहींना बदलीमधून लाभ मिळेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींचा विशिष्ट सन्मान होईल. नैतिक विजय संपादन कराल. काहींना पुत्रोत्कषार्तून धन्यता लाभेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट घरात आनंदोत्सव आणणारा ठरेल. बेरोजगारांना नोकरी लागेल, कलाकारांचा भाग्योदय.

झंझावाती यश लाभेल

मकर : शुभग्रहांचंच फिल्ड राहील. तरुणांना मोठ्या संधी मिळतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ४ ते ६ हे दिवस झंझावाती यशाचे. स्पर्धात्मक यशाची शक्यता. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून लाभ मिळतील. पती व पत्नीचा मोठा भाग्योदय. मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येजवळ स्त्रीहट्ट सांभाळावा. बाकी अमावस्या नोकरीतील शत्रुत्व संपुष्टात आणणारी ठरेल.

छंद-उपक्रमांतून यश लाभेल

कुंभ : बुद्धिजीवी मंडळींना शुभग्रहांचे योग मोठी ऊर्जा देतील. तरुणांना अमावस्येचं फिल्ड शुभच असेल. ता. ५ ते ७ हे दिवस छंद, उपक्रमांतून यश देतीलच. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती त्यांच्या विशिष्ट यशातून चर्चेत राहतील. विशाखा नक्षत्रांच्या व्यक्तींचा पुत्रोत्कर्ष समारंभ करेल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात या सप्ताहात मोठ्या चैनीचे योग आहेत.

नोकरीत कर्तृत्वाला वाव मिळेल

मीन : शुभ ग्रहयोगांचा मोठा आवाका राहील. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती मोठा लाभ घेतील. सप्ताहाची सुरुवात दमदार राहील. नोकरीत कर्तृत्‍वाला वाव मिळेल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती वलयांकित होतील. जीवनातील एखादी खंत निघून जाईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येजवळ घरातील वृद्धांची काळजी घ्यावी. अमावस्येच्या काळातल्या गाठीभेटीतून लाभदायी ठरतील. ओळखीतून लाभ होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com