weekly horoscope 11th jfebruary 2024  to 17th february 2024
weekly horoscope 11th jfebruary 2024 to 17th february 2024Sakal

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : (११ फेब्रुवारी २०२४ ते १७ फेब्रुवारी २०२४)

सप्ताहातील शुक्राचं राश्यांतर अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उत्सव-समारंभातून उत्तम बोलेल. काहींना कर्जमंजुरीतून मोठा दिलासा मिळेल.

कर्जमंजुरीतून दिलासा मिळेल

मेष : सप्ताहातील शुक्राचं राश्यांतर अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उत्सव-समारंभातून उत्तम बोलेल. काहींना कर्जमंजुरीतून मोठा दिलासा मिळेल. ता. १४ व १५ हे दिवस मोठे चमत्कार घडवतील. हितशत्रूंना आवर बसेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना राजकीय लाभ घडतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार खरेदीत फसण्याचा. शुक्रवार सूर्योदयी कलहाचा.

छंद व उपक्रमातून प्रसिद्धी

वृषभ : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ नोकरीत हितशत्रू पीडेचा. काहींना स्त्रीहट्टातून त्रासाचा. बाकी ता. १४ फेब्रुवारीची वसंत पंचमी विशिष्ट सन्मान घडवेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १५ हे दिवस छंद वा उपक्रमांतून प्रकाशात आणतील. विशिष्ट कोर्टप्रकरण मार्गी लागेल. वास्तुविषयक व्यवहार होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार प्रवासात नुकसानीचा. विचित्र गाठीभेटी.

सरकारी कामं होतील

मिथुन : सप्ताह काहींना विशिष्ट वेदनेतून हैराण करणारा. रस्त्यावर चालताना जपून. बाकी सप्ताहाची सुरुवात पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक उपक्रमांतून छानच. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात विशिष्ट कायदेशीर गोष्टी सतावतील. शनिवार विचित्र वादावादीचा ठरू शकतो. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मातृचिंता सतावेल. बाकी गुरुवार सुवार्तांतून धमाल उडवेल. सरकारी कामे होतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखीचा लाभ होईल.

नोकरीतील राजकारणाचा त्रास शक्य

कर्क : अतिशय संमिश्र ग्रहमान राहील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्राच्या राश्यांतराचा उत्तम लाभ होईल. पती वा पत्नीचा भाग्योदय. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १५ हे दिवस मोठे गतिमान राहतील. व्यावसायिक उत्सव -प्रदर्शनांतून लाभ. मात्र सप्ताहारंभ व्यावसायिक भागीदारीच्या संदर्भातून वाद निर्माण करू शकतो. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील राजकारणातून त्रास होऊ शकतो. क्वचित बदलाची चाहूल अस्वस्थ करेल.

उपद्रव होणारा सप्ताह, वाद टाळा

सिंह : सप्ताहातील ग्रहयोगांचा ट्रॅक विचित्र अडचणी आणू शकतो. यंत्रं, वाहनं आणि कामगार या त्रिघटकांतून उपद्रव निर्माण करणारा सप्ताह. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी अपवादात्मक उद्‍भवू पाहणाऱ्या परिस्थितीचं भान ठेवावं. बाकी ता. १४ व १५ हे दिवस आपल्या राशीस एकूणच अडचणींवर मात करणारे. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक धनलाभ किंवा व्यावसायिक वसुली. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार संध्याकाळ अकारण बाचाबाचीची.

भाजणं-कापणं, श्‍वानदंशापासून काळजी घ्या

कन्या : सप्ताहातील ग्रहमान संमिश्र स्वरूपाचं. सप्ताहारंभी जुगारसदृश व्यवहार टाळा. बाकी सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना चांगला प्रतिसाद देईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींचे मोठे व्यावसायिक करारमदार होतील. व्यावसायिक भांडवल पुरवठा होईल. पुत्रचिंता जाईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट भाजण्या-कापण्यापासून जपण्याचा. श्वानदंशापासून काळजी घ्या.

अरेरावी नको, संतापाला आवर घाला

तूळ : सप्ताहातील ग्रहयोगाचा ट्रॅक थोडा अडथळ्यांतून नेणारा. वाहनांवर जपून राहा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी अरेरावी अजिबात टाळावी. गृहिणींनी संताप आवरावा. बाकी वसंत पंचमीचा बुधवार वैयक्तिक उपक्रम गाजवेल. विवाहेच्छूंच्या गाठीभेटी किंवा कनेक्टिव्हिटी. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींची वास्तुविषयक कामे मार्गी लागतील. गुरुवारी तरुणांना नोकरीचे उत्तम प्रस्ताव येतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या शेवटी आरोग्यविषयक पथ्यं पाळावीत.

मित्रांचं सहकार्य लाभेल

वृश्चिक : सप्ताहातील शुक्रभ्रमणाची सप्तपदी छानच साथ देईल. मित्रांचं सहकार्य लाभेल. फक्त आजची संध्याकाळ आणि शनिवारची संध्याकाळ वार्तालापातून सांभाळावी. प्रेमिकांनी जपून. बाकी ता. १३ व १४ हे दिवस अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना छान मानसिक कोषात ठेवतील. घरात कोणाचं लग्न ठरवाल. ज्येष्ठा नक्षत्राची व्यक्ती सप्ताहात चैनीवर खर्च करेल.

मंत्रालयातली कामं होतील

धनु : आजचा रविवार मौजमजेचे एक पर्व सुरू करेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती मॅन ऑफ दि मॅच होतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ ते १५ हे दिवस मोठे गतिमानच राहतील. राजकीय व्यक्तींकडून लाभ. मंत्रालयातली कामं होतील, पूर्वाषाढा नक्षत्राच्या तरुणांना नोकरीत मानांकन मिळेल. मात्र शनिवारी वेंधळेपणा टाळा.

थट्टामस्करी - हट्टीपणा नको

मकर : राशीतील शुक्राचं आगमन एकंदरीतच चांगलाच बूस्टर डोस देईल. तरुणांना विवाहविषयक कनेक्टिव्हिटी लाभेल. श्रवण नक्षत्र वसंत पंचमीजवळ मोहरेल. ता. १३ ते १५ हे दिवस हुकमी कामं करून देणारे. अर्थातच जीवनात उत्तम सीक्वेन्स लागतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात हट्टीपणा टाळावा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात थट्टामस्करी टाळावी.

आचारसंहिता पाळा, शांत राहा

कुंभ : सप्ताह आचारसंहिता पाळण्याचा. आजचा रविवार राशीच्या शनिभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर हेच सांगत आहे. बाकी ता. १४ च्या वसंत पंचमीची संध्याकाळ गाठीभेटींतून हृद्य राहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १५ चा गुरुवार देवदर्शनाचा आणि दैवी प्रचितीचा. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार विवाहविषयक गाठीभेटींचा. मात्र शनिवारी संध्याकाळी शांत राहा.

करारमदार लाभदायक ठरतील

मीन : सप्ताहात वसंत पंचमीजवळ शुभग्रहांची कनेक्टिव्हिटी राहीलच. अर्थातच ता. १३ च्या गणेश जयंतीला धरून असलेलं वसंत पंचमीचं प्रभावक्षेत्र आपल्यावर देवदेवतांचा अनुग्रह ठेवेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक करारमदारांतून लाभ होतील. तरुणांचं नैराश्य जाईल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रेमप्रकरणातून गती मिळेल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात चुकीच्या मित्रांची संगत टाळावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com