
साप्ताहिक राशिभविष्य (१३ फेब्रुवारी २०२२ ते १९ फेब्रुवारी २०२२)
सप्ताह पर्वणीसारखा वाटेल
मेष : सप्ताहात मंगळ-शुक्र लव्हबर्डस तरुणांना मोठी कनेक्टिव्हिटी देतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह एका पर्वणीसारखा. सतत प्रकाशझोतात राहाल. ता. १६ व १७ हे दिवस व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी करतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचं प्रेम प्रकरण ओलावा पकडेल.
नोकरीत पद चालून येईल
वृषभ : पौर्णिमेचं फिल्ड ता. १५ व १६ या दिवसांत मोठं मजेदार राहील. नोकरीत रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींकडे एखादं पद चालून येईल. उद्याचा सोमवार सुंदर गाठीभेटींचा. ता. १८ आणि १९ हे दिवस घरात मोठ्या आनंदोत्सवाचे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींची मोठी खरेदी. विवाहस्थळं चालून येतील.
कौतुक व सत्कार होतील
मिथुन : सप्ताह ग्रहयोगांतून मोठा रंगतदार राहील. जाल तेथे कौतुक वा आदरसत्कार होतील. सहवासातील स्त्रीवर्ग किंवा स्त्रियांच्या सहवासातील पुरुषवर्ग ताब्यात राहील. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र सर्व स्तरांवरून विक्रम मोडणारं. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना छान गुरुबळ राहील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळ-शुक्र लव्हबर्डस सतत बखोट पकडून मौजमजा करवतील.
आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल
कर्क : व्यावसायिकांना सप्ताह छानच राहील. विशिष्ट ओळखी, मध्यस्थी फलदायी होतील. स्त्रीमुळे धनलाभ होतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा परदेशी लाभ देईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा शुक्रवार आर्थिक संकटातून मुक्त करणारा.
शिक्षण - नोकरीमध्ये भाग्योदय
सिंह : पौर्णिमेचं फिल्ड पूर्णतः शुभ ग्रहांचं. मंगळ-शुक्र लव्हबर्डस संमोहनशक्ती वाढवतील. पूर्वा नक्षत्रास सप्ताहाचा शेवट शिक्षण, नोकरी व विवाह या त्रिघटकांतून भाग्य उलगडवेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा दैवी प्रचितीची! प्रेमप्रकरण मार्गी लागेल. वास्तुयोग.
मुलाखतींमध्ये छाप पाडाल
कन्या : सप्ताह उत्तम व्यावसायिक घडामोडींचा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार बुधाच्या विशिष्ट स्थितीतून नोकरीत भाग्योदयाचा. नोकरीच्या मुलाखतींतून छाप पाडाल. हस्त नक्षत्रास सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठ्या धनलाभाचा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती नूतन वास्तुप्रवेश करतील.
नोकरीत मनासारखी बदली
तूळ : सप्ताहातील पौर्णिमेच्या प्रभावात मोठं गुरुबळ राहील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहातील प्रत्येक वन डे जिंकतील. सप्ताहात स्त्रीवर्गास मोठे लाभ. विशिष्ट उंची खरेदी होईल. नोकरीत मनासारखी बदली. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळ-शुक्र युतियोग गुंतवणूक यशस्वी करेल. शेअर बाजारात लाभ.
व्यावसायिक पतप्रतिष्ठा लाभेल
वृश्चिक : पौर्णिमेचं फिल्ड लव्हबर्ड मंगळ-शुक्राच्या ताब्यात राहील. तरुणांना रान मोकळं राहील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती नोकरीत वरिष्ठांना ताब्यात घेतील, व्यावसायिक पतप्रतिष्ठा लाभेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या मार्केटिंगचा, सरकारी कनेक्टिव्हिटी लाभेल!
ऐश्वर्यसंपन्न व्हाल
धनू : आपली गुरूची रास सप्ताहात पौर्णिमेचं वैभव उपभोगणार आहे. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींची जीवनातील श्रद्धा बळकट होणार आहे. पौर्णिमेजवळ जीवनातील एखादं शल्य जाईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्ती ऐश्वर्यसंपन्न होतील. पुत्रचिंता कायमची जाईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींस सप्ताहाचा शेवट हृद्य घटनांतून आनंदाश्रूंचा.
करारमदार यशस्वी होतील
मकर : सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठा मजेदार राहील. उद्याचा सोमवार गाठीभेटी, मुलाखती व व्यावसायिक करारमदार यशस्वी करणारा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्तचिंता जाईल. एखाद्या स्त्रीचं पाठबळ शक्ती देईल. नोकरीत बदलीचं काम होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाचा शेवट मंगळ-शुक्राच्या लव्हबर्डस जोडीमुळे आगतस्वागताचा. वैवाहिक जीवन फुलेल.
आनंदोत्सव साजरा करणारा काळ
कुंभ : सप्ताह मोठ्या गुरुबळाचा. सप्ताहात उपासनेला दृढ चालवावे. सप्ताह एका रंगासारखाच राहील. तरुणांना पौर्णिमेचं फिल्ड सर्वस्वी शुभ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींस ता. १७ व १८ हे दिवस मंगळ-शुक्राच्या पॅकेजमधून मोठे आनंदोत्सव साजरे करतील. पूर्वाभाद्रपदा व्यक्तींना सरकारी लाभ.
वास्तुविषयक प्रश्न सुटतील
मीन : सप्ताहाची सुरुवात मोठी दणक्यात होईल. घरातील तरुणांचे उत्कर्ष होतील. पती वा पत्नीचा अनपेक्षित भाग्योदय होईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा वास्तुविषयक प्रश्न सुटेल. उद्याचा सोमवार उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या नोकरीत वरिष्ठांच्या अनुग्रहाचा. सप्ताहाच्या शेवटी रेवती नक्षत्राचे लव्हबर्डस आणि नवपरिणीत आनंदोत्सव साजरा करतील.
Web Title: Weekly Horoscope 13th February 2022 To 19th February 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..