

मेष : अमावस्येचं प्रभावक्षेत्र गाठीभेटींतून अस्वस्थ करणारं. क्रिया-प्रतिक्रिया जपा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना कामगारपीडा होण्याची शक्यता. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना खरेदी-विक्रींतून फसण्याचे प्रसंग येतील. बाकी श्रीगणेशाचं आगमन अतिशय थाटात होईल. पुत्रविषयक एखादी चिंता जाईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार दैवी प्रचितीचा ठरेल. व्यावसायिक वसुली होईल. कायदेशीर बाबींबाबतच्या समस्या संपतील.
वृषभ : शुभ ग्रहांची लॉबी क्रियाशील राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या खर्चाची ठरेल. बाकी श्रीगणेशाचे आगमन सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट मानसन्मानाचे योग आहेत. ता. ५ व ६ हे दिवस व्यावसायिकांना तेजीचे ठरतील. विशिष्ट प्रदर्शनं यशस्वी होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांच्या ओळखींतून लाभ होईल.
मिथुन : राशीचा मंगळ मानसिक पर्यावरण बिघडवणारा. ता. २ व ३ हे दिवस मृग नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट वादात ओढणारे. वाहनांचं पार्किंग सांभाळा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीत वरिष्ठांना सांभाळावे. बाकी श्रीगणेशोत्सवात शुभ ग्रहांची उत्तम साथसंगत. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभाची शक्यता. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत पगारवाढीची शक्यता. पुत्रोत्कर्ष होईल. पती वा पत्नीची चिंता जाईल.
कर्क : शुभ ग्रहांचं सप्ताहात अधिष्ठान राहील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट व्यावसायिक उत्कर्षाचा असेल. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. २ व ३ या दिवशी अमावस्येचं प्रभावक्षेत्र लक्षात घेऊन सार्वजनिक जीवनातून जपावं. बाकी सप्ताहाचा शेवट घरात मंगलमयी वातावरण ठेवेल. घरातील तरुणांचे विवाह ठरतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींनी शनिवारी वेंधळेपणा टाळावाच.
सिंह : शुभ ग्रहांची अतिशय छान स्पंदने राहतील. फक्त अमावस्येजवळ मूर्खांशी संवाद नको. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना श्रीगणेशाचं आगमन मोठे भाग्य संकेत देणारे. व्यावसायिक वसुलीतून लाभ होईल. तरुणांना नोकरीच्या उत्तम संधी येतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखी-मध्यस्थींमधून लाभ होतील. विवाह ठरतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात वाहनभयाची आहे, त्यामुळं दुखापतीपासून सांभाळा.
कन्या : श्रीगणेशाचं आगमन जीवनातील एक सुंदर पर्व सुरू करणारं. घरातील तरुणांची कार्ये ठरतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या धनवर्षावाचा ठरेल, एखादा गॉडफादर भेटेल. बँकांची कामे होतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग आहे. मात्र सप्ताहाच्या सुरुवातीस संसर्गापासून जपा. गर्दीच्या ठिकाणी सांभाळा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार, शुक्रवार मोठे भाग्याचे असतील.
तूळ : सप्ताहाची सुरुवात विशिष्ट नुकसानीच्या शक्यतेची. खरेदी-विक्री जपूनच करावी. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येजवळ भावनिक शॉर्टसर्किट टाळावेच. बाकी ता. ५ व ६ हे दिवस व्यावसायिक संदर्भातून प्रसन्न ठेवतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना गाठीभेटींतून लाभ होतील. विशिष्ट करारमदार संपन्न होतील. वादग्रस्त वसुली होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या नोकरीतील गुप्तचिंतेची ठरण्याची शक्यता.
वृश्चिक : शुभ ग्रहांचं उत्तम अधिष्ठान राहील. जीवनातील श्रद्धा बळकट होतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सिद्धी प्राप्त होतील. ता. ५ व ६ हे दिवस मोठी भाग्यबीजं पेरतील. मात्र सुरुवातीस अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात सार्वजनिक जीवन सांभाळा. वाहनं, यंत्रं सांभाळा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट वचनपूर्तीचा आनंद मिळेल. श्रीगणेशाचं आगमन वैवाहिक जीवन प्रसन्न ठेवेल.
धनु : अमावस्येनंतर शुक्रभ्रमण स्वतंत्र अशी फळं देईल. होतकरू तरुणांना सप्ताहातील श्रीगणेशाचं आगमन छान संकेत देईल. नोकरीतील एखादी गुप्तचिंता जाईल. फक्त सुरुवातीच्या अमावस्येचे प्रभावक्षेत्र व्यावसायिक कामगारपीडेतून सतावेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार घरी आणि दारी प्रसन्न अशा भावस्पंदनाचा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिकदृष्ट्या उत्तम उलाढालींचा कालखंड.
मकर : सप्ताहातील शुभ ग्रहांचे सुंदर पर्यावरण अनुभवणारी रास राहील. अमावस्येनंतर शुक्रकलांच्या उधाणातून व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनांतून मोठे लाभ. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना मानसन्मानाचे योग आहेत. घरातील तरुणांचे भाग्योदय होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ५ व ६ हे दिवस विशिष्ट मुलाखती वा गाठीभेटींतून मोठे फलद्रूप होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात या सप्ताहात वैवाहिक जीवनात बहारीचा कालखंड.
कुंभ : अमावस्येचे प्रभावक्षेत्र कायिक, वाचिक आणि मानसिक प्रदूषणातून नेईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना यंत्रं, वाहने आणि कामगार इत्यादींतून बेरंग करणारी अमावस्या. बाकी ता. ५ व ६ हे सणासुदीचे दिवस अतिशय हृद्य स्पंदने ठेवतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मानसन्मानाचे योग आहेत. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी घरी वा दारी राग आवरावा लागेल.
मीन : अमावस्येनंतर शुभ ग्रहांची लॉबी बलवानच राहील. अमावस्येजवळ भाजणं, कापणं जपावं. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सोमवारी प्रिय व्यक्तींशी गैरसमज टाळावेत. बाकी ता. ५ व ६ हे दिवस दैवी प्रचितीचेच. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह व्यावसायिक संदर्भातून एक पर्वणी ठरेल. ओळखी-मध्यस्थी फलद्रूप होतील. विवाहेच्छूंना उत्तम विवाहस्थळं येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.