एम. करुणानिधी यांचे काही दुर्मिळ चित्र...

मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे आज (मंगळवार) चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कावेरी रुग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर त्यांचे निधन झाले. भारताच्या राजकारणात सलग सहा दशकांवर सक्रिय राहिलेल्या एम. के. करूणानिधी या नावाने तमिळनाडूतील जनतेवर अधिराज्य गाजवले. चित्रपट कथालेखक, पुरोगामी, अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न, जाचक प्रथा, परंपरांना विरोध, हिंदीविरोधी भुमिका या मुद्दांवर आयुष्यभर लढलेल्या करूणानिधींचे द्रष्टेपण त्यांच्या जीवनातील वाटचालीतून दिसते.

डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा राहिलेले करुणानिधी पाचवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून 94 वर्षीय करुणानिधी यांच्यावर उपचार सुरु होते. रक्तदाब जाणवू लागल्याने त्यांना 28 जुलैला कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. करुणानिधी यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.