वेडाराघूची किमया...

मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

नाशिक ः हवेत कीडे पकडून खाणारा पक्षी म्हणून त्याची वेडाराघू ची ओळख. उष्ण कटीबंधातील बहुतेक सर्व देशात त्याचे वास्तव्य आहे. भारतात तो मोठ्याप्रमाणात दिसतो. पक्षी निरीक्षकांच्या पाहणीत गेल्या काही वर्षात त्याची संख्या रोडावली. हा पक्षी हिरव्या रंगाचा असून शेपटी एका रेषेप्रमाणे असते. संध्याकाळी हे पक्षी थव्याने विजेच्या तारांवर ओळीने बसलेले असतात. हवेत उडत राहणाऱ्या कीटकांना तो टिपतो. तो दिसू लागताच, हिवाळ्याची चाहूल लागते. गोदापार्कवर आनंद बोरांनी टिपल्यात वेडाराघूच्या छबी.