अलंकापुरी भक्तिरसात न्हाली

सोमवार, 3 डिसेंबर 2018

आळंदी -  सनईचा मंजूळ स्वर...फुलांची आकर्षक सजावट...अन्‌ समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून ११ ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्रघोषात कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींना आज लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंचामृताने विधिवत पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर माउलींचे सजविलेले आकर्षक रूप डोळ्यात साठवत उपस्थित वारकऱ्यांनी केलेल्या माउलीऽ माउलींच्याऽऽ जयघोषाने अलंकापुरी दुमदुमून गेली. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)