मेट्रोचे पायलिंग मशिन  कोसळ्यामुळे वाहतुकीचा खोळंबा; जिवितहानी नाही   

शनिवार, 5 जानेवारी 2019

नाशिकफाटा येथील दुहेरी उड्डाण पुलाजवळ वर्दळीच्या रस्त्यावर मेट्रोच्या पाया खोदण्यासाठी वापरण्यात येणारे पायलिंग मशीन आज दुपारी सव्वादोनच्या सुमाराला कोसळले. पीएमपीची बस थोडी पुढे गेलेली, तर पाठीमागून येणाऱ्या कारचालकाने जोरात ब्रेक दाबत गाडी जागीच थांबविल्यामुळे, या अपघातात वाहन अथवा व्यक्ती सापडली नाही. पुण्याकडून पिंपरीकडे येणाऱ्या मार्गावर काही टन वजनाची अवाढव्य मशीन कोसळल्यामुळे तेथील सर्व वाहतूक ठप्प झाली. पुण्याकडून चौकाच्या दिशेने येणाऱ्या पुलाच्या उताराजवळ ही घटना घडली. यामुळे दोन तास सेवा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

नाशिकफाटा येथील दुहेरी उड्डाण पुलाजवळ वर्दळीच्या रस्त्यावर मेट्रोच्या पाया खोदण्यासाठी वापरण्यात येणारे पायलिंग मशीन आज दुपारी सव्वादोनच्या सुमाराला कोसळले. पीएमपीची बस थोडी पुढे गेलेली, तर पाठीमागून येणाऱ्या कारचालकाने जोरात ब्रेक दाबत गाडी जागीच थांबविल्यामुळे, या अपघातात वाहन अथवा व्यक्ती सापडली नाही. पुण्याकडून पिंपरीकडे येणाऱ्या मार्गावर काही टन वजनाची अवाढव्य मशीन कोसळल्यामुळे तेथील सर्व वाहतूक ठप्प झाली. पुण्याकडून चौकाच्या दिशेने येणाऱ्या पुलाच्या उताराजवळ ही घटना घडली. यामुळे दोन तास सेवा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. याची छयाचित्रे सकाळचे छयाचित्रकार संतोष हांडे यांनी टिपली आहेत  

टॅग्स