पिंपरी-चिंचवड शहारात जीवघेणी वाहतूक

मंगळवार, 22 जानेवारी 2019

शहारातील पिंपरी ते काळेवाडी, चिंचवड स्टेशन ते चिंचवडगाव, डांगे चौक ते चिंचडगाव, डांगे चौक ते रावेत, पिंपरी ते भोसरी, आकुर्डी ते चिखली, निगडी ते भोसरी मार्गांवर रिक्षांमध्ये प्रमाणापेक्षा जादा प्रवासी बसवून वाहतूक सुरू आहे. रिक्षामध्ये फक्त तीन जणांनी बसावे, असा नियम आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पाच ते सात प्रवासी बसविले जातात. अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)

क्षमतेहून अधिक प्रवासी बसवून बेकायदा रिक्षा चालविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी आम्ही अनेकदा मागणी केली आहे. मात्र त्याकडे पोलिस आणि वाहतूक शाखेकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. प्रवाशांच्या जीव धोक्यात घालून वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.
- बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत