न्यूझीलंडमध्ये दहशतवादाचे थैमान

शुक्रवार, 15 मार्च 2019

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये गोळीबार आज (शुक्रवार) करण्यात आला. या गोळीबारात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्लेखोरांनी गोळीबाराचे लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केले होते. त्यांनी काळे कपडे परिधान केले होते. या प्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघ थोडक्यात बचावला आहे. 