जिवावर बेततेय चिखलीतील प्रदूषण

प्लॅस्टिक कचरा जाळल्याने धुराचा त्रास; इंद्रायणी नदीत रसायनमिश्रित पाणी
चिखली - कुदळवाडी- मोशी परिसरात दररोजच रसायनमिश्रित कचरा आणि प्लॅस्टिक जाळण्यात येतो. त्याचबरोबर रसायनमिश्रित पाणी इंद्रायणी नदीत सोडले जाते. त्यामुळे हवा आणि पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यामुळे इंद्रायणीतील जलचरांबरोबरच नागरिकांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे.

चिखली- कुदळवाडीतील स्थिती
- कुदळवाडी परिसरात सुमारे एक हजार भंगार मालाची गोदामे आणि दुकाने
- महापालिकेच्या पाहणी अहवालानुसार 95 टक्के व्यवसाय अनधिकृत
- प्लॅस्टिक व थर्माकोल मोल्डिंग, वायर जाळून तांबे काढणे, प्लॅस्टिक वर्गवारी उद्योग
- प्लॅस्टिक कचरा, थर्माकोल इंद्रायणी नदी पात्राच्या परिसरात जाळला जातो
- प्लॅस्टिक पिंप धुण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा वापर, तेच पाणी सरळ नदीपात्रात
- चाकण, भोसरी औद्यागिक परिसरातून आणलेला कचराही जाळला जातो
- जाळलेला कचरा पंधरा-पंधरा दिवस धुमसत असतो

वायू- जल प्रदूषणाचा परिणाम
- इंद्रायणी नदीतील जलचरांच्या जिवास मोठा धोका
- कचरा जाळल्याने कार्बन मोनॉक्‍साईड, सल्फरडाय ऑक्‍साईड अशी श्‍वसनाला हानिकारक वायूंची निर्मिती
- सिलिकॉन, लोखंडाची रेती परिसरात आणून टाकली जात असल्याने ती हवेत मिसळून डोळ्यांना त्रास
- परिसरातील रहिवासी आजारी पडत असून आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप

प्रदूषण रोखण्याची मागणी
चिखली - कुदळवाडी परिसरातील वायू व जल प्रदूषणाबाबत महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार केली आहे. त्यांचे अधिकारी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करीत असून प्रदूषणाला त्वरित आळा घालण्याची मागणी चिखली- मोशी फेडरेशनने केली आहे.

आर्थिक लागेबांध्यांची शक्‍यता
महापालिकेचा पर्यावरण विभाग पूर्णपणे निष्क्रिय आहे. गेल्या दहा वर्षांपासून वारंवार पत्रव्यवहार करूनही कारवाई केली जात नाही. यामागे महापालिका अधिकारी आणि भंगार आणून जाळणाऱ्या व्यावसायिकांमध्ये आर्थिक लागेबांधे असावेत, अशी शंका येते, असा आरोप पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांनी केला आहे.

46190
chi 12p1 -

46192
chi 12p2
46196
chi 12p6

46199
chi 12p8
46191
chi 12p10

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com