उत्सव बाप्पाचा, उत्साह लातूरकरांचा

शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

लातूर : दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण देखावा करणाऱ्या लातूरमधील बप्पा उत्सव मंडळाने आपल्या बाप्पा उत्सवात यंदा थय्यम ही केरळमधील अनोखी लोककला महाराष्ट्रातील ढोल-ताशा या वाद्याच्या तालावर सादर केली. यानिमित्ताने दोन राज्यातील संस्कृतीचा अनोखा मिलाफ लातूरकरांना विसर्जन मिरवणूकीत अनुभवायला मिळाला. शिवाय, शहरात पाण्याचा दुष्काळ असला तरी लातूरकरांच्या उत्साहात ‘दुष्काळ’ नव्हता, याचेही दर्शन झाले. या वेळी कानावर पडणाऱ्या केरळच्या पारंपारिक संगीतामुळे आणि पारंपरिक नृत्यामुळे डोळ्यासमोर केरळ अवतरल्याचेच अनेकांना भासत होते. मंडळांचा हा जिवंत देखावा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.

(संकलन : सुशांत सांगवे)