महाजनयात्रेचे उत्स्फुर्त स्वागत,पावसाची हजेरी अन् आंदोलनाचा प्रयत्न....

बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नाशिकः  मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला नाशिकच्या सिडको भागात आज उत्साहात सुरवात झाली. चौकाचौकात कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर रांगोळ्या काढत तसेच फुलांची उधळण करत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.मध्य नाशिक भागात ढोलपथकाने स्वागत झाले. पालकमंत्री गिरीष महाजन,महाराष्ट्राचे प्रभारी धर्मेश प्रधान,आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. गोल्फ क्लबपर्यत मोटारसायकल रॅलीने सहभागी झालेले कार्यकर्ते यापुढील भागात यात्रेच्या गाडीबरोबर पायी गेले. याच दरम्यान जोरदार पाऊसाने हजेरी लावल्याने मुख्यमंत्र्यांसह,पदाधिकाऱ्याची धांदळ उडाली.

नाशिकः  मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला नाशिकच्या सिडको भागात आज उत्साहात सुरवात झाली. चौकाचौकात कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर रांगोळ्या काढत तसेच फुलांची उधळण करत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.मध्य नाशिक भागात ढोलपथकाने स्वागत झाले. पालकमंत्री गिरीष महाजन,महाराष्ट्राचे प्रभारी धर्मेश प्रधान,आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. गोल्फ क्लबपर्यत मोटारसायकल रॅलीने सहभागी झालेले कार्यकर्ते यापुढील भागात यात्रेच्या गाडीबरोबर पायी गेले. याच दरम्यान जोरदार पाऊसाने हजेरी लावल्याने मुख्यमंत्र्यांसह,पदाधिकाऱ्याची धांदळ उडाली. अखेर सीबीएस,शालीमार भागात यात्रा थोड्यावेळेत थांबविण्यात आली. रोड शो दरम्यान काही विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आली. शहर परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाजनयात्रेची वैशिष्ठे सांगणारी ही काही दृश्ये( छायाचित्रे-सोमनाथ कोकरे, केशव मते, नरेश हळणोर,प्रमोद दंडगव्हाळ)