शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ नाशकात निदर्शने

बुधवार, 25 सप्टेंबर 2019

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज बुधवार ( ता. २५) ठेिकठिकाणी निदर्शने  करण्यात आली.

-निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील तहसिल कार्यालयावर माजी आमदार दिलीप बनकर, राजेंद्र डोखळे, सुभाष कराड यांच्या नेतृत्वाखाली  निदर्शने करुन अधिका-यांना निवेदने देण्यात आली.

-शहरातील राष्ट्रवादी भवन येथे देखील सकाळी निदर्शने करण्यात आली.

-सिन्नर येथे सरकारच्या विरुद्ध घोषणा देऊन निषेध करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ , प्रदेश चिटणीस राजाराम मूरकुटे , शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, प्रदेश सचिव रविंद्र काकड, युवक तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, वामनराव पवार , प्रमोद सांगळे, दत्तात्रय डोंगरे, डी. डी. गोरडे, गोपीनाथ झगडे, नामदेव वाघ आदी उपस्थित होते