तुळजाभवानी मंदिर फुलांनी सजविले

मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : नवरात्रोत्सवानिमित्त रांजणगाव (जि. पुणे) येथील नानासाहेब पाचुंदकर-पाटील यांनी मंगळवारी तुळजाभवानी मातेचे मंदिर वेगवेगळ्या फुलांनी सजविले. पुणे येथील फूल व्यावसायिक, कारागिरांना मंदिरात पाठवून पहाटेपासून सजावट सुरू केली. यज्ञमंडप, मुख्य गाभारा, मंदिराचा मुख्य भाग, उपदैवतांची मंदिरे फुलांनी सजवली. सकाळी अकराच्या सुमारास तुळजाभवानी मातेचा गाभारा सजविण्यात आला. फुलांतून देवीची मूर्ती साकारली. तीनशे किलो शेवंती, आठशे किलो झेंडूसह अन्य फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. वीस कारागिरांनी फुलांच्या माळा गुंफल्याचे पुण्यातील श्री फ्लॉवर्सचे कुमार शिंदे यांनी सांगितले.