जागर आदिशक्तीचा, उत्सव नवरंगांचा (करडा रंग) 

रविवार, 6 ऑक्टोबर 2019

पिंपरी - पारंपरिक पद्धतीने शहरात शारदीय नवरात्रीला सुरूवात झाली. हे नऊ दिवस मांगल्याचे एकतेचे प्रतिक म्हणून भक्तीभावाने साजरे केले जातात. नवरात्रामध्ये घातल्या जाणाऱ्या
कपड्यांच्या रंगांमध्ये कोणतीही धार्मिक आधार नसला तरी तो नवरंगांचा उत्सव आहे. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे परिधान केल्यामुळे नवरात्र खुलते. महिलांमध्ये
एकजुटीची भावना जोपासली जाते. मनात उत्साह, आनंद व सुरक्षिततेची भावना निर्माण होते. स्वाभिमान व आत्मविश्वास जागृत होतो. स्त्री शक्तीचे दर्शन घडते व सर्व जण

एकत्रितरीत्या हा नवरात्रोत्सव खऱ्या अर्थाने साजरा करतात. हाच उद्देश प्राधान्याने नवरात्रातील नवरंगांमध्ये आहे. "सकाळ नवरंग'च्या निमित्ताने शनिवारी (ता.5)ला करड्या रंगाची
वस्त्रे परिधान केलेल्या छायाचित्रांसह महिला व तरूणींनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.