निसर्ग सौंदर्यानं वैभवशाली असलेलं सिक्कीम...

गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

सिक्कीम : हिमालयाच्या कुशीत विसावलेले अत्यंत देखणे आणि शांत राज्य म्हणजे सिक्कीम. भारताच्या ईशान्य सीमेवर असलेलं राज्य. भारतातील पहिले ‘सेंद्रिय’ राज्य. तसं ह्या राज्याला आपल्या भौगोलिक रचनेमुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्याच्या तीन दिशांना चीन आणि भूतान हे देश पसरलेले. खूप शांत-निवांत आणि तितकंच निसर्गरम्य सिक्कीम. सिक्कीममध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं हा एक वेगळाच अनुभव. चारही बाजूंनी वेढलेल्या हिमालयाच्या शिखरांवर सूर्याचे किरण पडून त्यांचा सोनेरी होणारा रंग आणि सगळाच भारावून गेलेला आसमंत कधीही विसरता येत नाही. निसर्गदेवतेने आपल्या रंगांची इथे मुक्तहस्ते उधळण केली आहे.

सिक्कीम : हिमालयाच्या कुशीत विसावलेले अत्यंत देखणे आणि शांत राज्य म्हणजे सिक्कीम. भारताच्या ईशान्य सीमेवर असलेलं राज्य. भारतातील पहिले ‘सेंद्रिय’ राज्य. तसं ह्या राज्याला आपल्या भौगोलिक रचनेमुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्याच्या तीन दिशांना चीन आणि भूतान हे देश पसरलेले. खूप शांत-निवांत आणि तितकंच निसर्गरम्य सिक्कीम. सिक्कीममध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं हा एक वेगळाच अनुभव. चारही बाजूंनी वेढलेल्या हिमालयाच्या शिखरांवर सूर्याचे किरण पडून त्यांचा सोनेरी होणारा रंग आणि सगळाच भारावून गेलेला आसमंत कधीही विसरता येत नाही. निसर्गदेवतेने आपल्या रंगांची इथे मुक्तहस्ते उधळण केली आहे. पश्चिम सिक्कीम मध्ये असलेली ओखरे, बारसे आणि यक्सम हि ठिकाणं म्हणजे अलौकिक निसर्ग सौंदर्याचा नमुनाच म्हणायला हरकत नाही. सिक्कीममधील विविध भागांमध्ये डॉ. अंकुश लवांडे यांनी टिपलेली छायाचित्रे.