फोटो : महिला मतदान अधिकारीतर्फे संचालित मतदानकेंद्र

नाशिक : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्र क्रमांक 55, नवजीवन विद्यालय, शिवशक्ती चौक, सिडको या मतदान केंद्रावर एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणून हे मतदान केंद्र संपूर्णतः महिला मतदान अधिकारी यांचे द्वारे संचालित होत आहे . सदर ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचारी हे महिला असणार आहेत, बंदोबस्तावरील सुरक्षा अधिकारी सुद्धा महिला असणार आहेत. निवडणूक प्रक्रियेत महिलांनी अ धिक सहभाग घ्यावा, यासाठी “सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे” च्या रूपात विशेष व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग नोंदविण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून सदर चा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे  (फोटो - प्रमोद दंडगव्हाळ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com